सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणेश चतुर्थी निमित्ताने भाविकांचे गर्दी !

[ नायगाव बा.ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
सिद्धिविनायक गणेश मंदिर बेटकबिलोली रोड खैरगाव गणेश नगर येथील नवसाला पावणारा सत्य गणपती चतुर्थी निमित्त महाप्रसाद आयोजित केला सर्व भाविक भक्तांनी महाप्रसाद व दर्शनासाठी मोठी गर्दी केली. 

नायगाव ते नरसी महामार्गावर असलेल्या बैठक बिलोली रोड वर खैरगाव येथील नवसाला पावणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान समजले जाणाऱ्या सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणेश चतुर्थी निमित्ताने भाविकाने दर्शनासाठी मोठी गर्दी केले होते यानिमित्ताने दर महिन्याला चतुर्थीला भंडारा होत आहे.

पहाटे काकड , मंगलस्नान, पूजा अर्चा, महाआरती, महाप्रसाद नैवेद्य श्री गणेशाला दाखवण्यात येते यानिमित्ताने दिवसभर महिला पुरुष बालकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या तर सायंकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर भाविकाच्या वतीने महाप्रसाद भंडाराच्या आयोजन केले होते भंडाऱ्याचे महाप्रसादाचा लाभ शेकडे भाविक मंडळींनी घेतला या मंदिराकडे लोकप्रतिनिधी लक्ष देऊन मंदिर परिसराचा कायापालट करण्याची मागणी भाविकांच्या वतीने करण्यात येत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या