लोह्यात काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वाक्षरी मोहिमेस सुरूवात!

( लोहा प्रतिनिधी – दत्ता कुरवाडे )

लोहा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे केंद्र शासनाने शेतकरी विरोधात केलेल्या कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांची स्वाक्षरी मोहीम सुरु केली.

सदर मोहिमेचे उद्घाटन शंकरराव चव्हाण शुगर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण,माजी सनदी अधिकारी तथा नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिलजी मोरे साहेब,मा.राहुल हंबर्डे युवा नेते यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार माजी नगरसेवक अनिल दाढेल, शरफोदीन शेख, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष बालाजी कपाळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

केंद्रातील भाजप सरकारने नुकतेच काळे कायदे पास केले आहेत.यामुळे शेतकरी, शेतमजुर,हमाल व बाजार समित्यांचे नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे.केंद्र सरकार कृषी मालही देशातील मोठ्या भांडवल दारांच्या दावणीला बांधत आहे व त्यांनी सर्वच उद्योग विक्रीला काढले असल्याचे म्हटले आहे.तसेच यासाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने पुढाकार घेतला असून त्यासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रपतींना दोन कोटी सह्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

त्यासाठी लोहा तालुक्यातून सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी मा.बांधकाम सभापती नगरसेवक पंकज परिहार,मा.उत्तम महाबळे, मा.अनिल दाढेल,कॉग्रेसचे जेष्ठ खादरभाई लदाफ, शहराध्यक्ष पांडुरंग शेट्टे, मधुकर दिघे, डॉ गवळी, बाबासाहेब बाबर, गजानन कळसकर, भूषण दमकोंडवार, व्यंकट पवार, पांडुरंग दाढेल, गोविंद कदम मेकॅनिक, शिवाजी मुंढे, बंडा शेटे, अझल शेख, विक्रत नळगे, सोपान डूंबूकवाड, अमोल महामूने, आदी उपस्थित होते.

लोहा-कंधार विधानसभा मतदार संघातून दहा हजार शेतकरी व शेतमजूर यांच्या सह्या घेण्यात येणार हा उपक्रम संपुर्ण मतदार संघात राबविण्यात येणार असल्याचे लोहा नगरीचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्या