शासकीय नियमाच्या आधीन सुरु झालेले कासराळी येथिल वायव्हीएस स्कील सेंटर राजकीय खेळीने थांबले.

 नाव नोंदणी करणाऱ्या शेकडो प्रशिक्षणार्थी गरजु युवक-युतींचे नुकसान ; संचालकास ६ लाखाची फसवणूक !

[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
प्रधानमंञी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपुर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्रीय कौशल्य विकास मंञालयाअंतर्गत कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्याच धरतीवर बिलोली तालुक्यातील कासराळी येथे  ही उद्घाटन करण्यात आले.

माञ शासकीय नियमाअधिन सुरु झालेले, कासराळी येथिल वायव्हीएस स्कील सेंटर राजकीय खेळीने थांबल्याने नाव नोंदणी करणाऱ्या शेकडो प्रशिक्षणार्थी गरजु युवक-युतींचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

तर संचालकाची जिल्हा समन्वयक आशिष बाजपेयी यांनी ६ लाखाची फसवणूक केल्याचे पुराव्यानिशी केंद्रप्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संग्राम हायगले यांनी पञकार परीषदेत सांगितले आहे.

नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वे बिलोलीचे तहसिलदार श्रिकांत निळे,महसुल अधिकारी रघुनाथसिंह चौव्हाण,तलाठी,ग्रामसेवक बिलोली-धर्माबाद आयटीआय’चे सहशिक्षक गादेवार यांच्या उपस्थित कासराळीच्या विठ्ठल रुक्माई मंदीर येथिल सभागृहात प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले होते. शासनाच्या योजनांचा नागरीकांना फायदा व्हावा या उद्देशाने संग्राम हायगले यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करुन स्कील सेंटरची उभारणी केली.
युवा विकास सोसायटीचे समन्वयक आशिष बाजपेयी यांच्या सुचनेप्रमाणे बैठकी,चर्चासञ आयोजित केले.आशिष बाजपेयी यांच्या फोन पे वर ३० हजारची रक्कम अदा करुन केल्याने आशिष बाजपेयी व व्यंकटेश लोणे यांनी सेंटरला भेट देऊन जागा व सुविधा योग्य असल्याचे सांगितले.
यासह कौशल्य विकास सहाय्यक आयुक्तांनी निवडीचे पञ ही दिले,इमारत भाडे अॕग्रीमेंटनंतर केंद्राची मेल आय.डी.देत केंद्र प्रमुखाची यादी सुचवली,साहित्य खरीदीच्या सुचना दिल्या.वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे सेंटरची सोईसुविधा करुन घेतली,प्रशिक्षणार्थी, त्यात ७५ टक्के महिलांची नाव नोंदणी केली,उद्घाटनास तब्बल लाखभर रुपये खर्च केले.
एकंदरीत PM-GKVK केंद्र उभारणीसाठी ६ लाखाचे खर्च झाले माञ ९ नोव्हेंबर रोजी अचानक व्हाटसअॕप ग्रुपमधुन काढले अन् केंद्राची प्रक्रिया थांबली.प्रशिक्षण केंद्राच्या योजनेत राजकारण व अर्थकारण आणुन सदरच्या योजनेचा बट्याबोळ करण्याचा प्रयत्न तर माझी आर्थिक फसवणूक केल्याप्रमाणी आशिष बाजपेयी यांच्याविरोधात वरिष्ठांसह न्यायालयात धाव घेणार असल्याचे केंद्रप्रमुख संग्राम हायगले यांनी पञकार परिषदेत सांगितले आहे.
——————— ——————
प्र.म.ग्रामीण कौशल्य स्कीम ही भाजपा’ची असुन मग ती राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या दारात उभी कशी? या उद्देशाने भाजपा’च्या स्थानिक पुढाऱ्यांने राजकीय दबाव आणुन ती अनाधिकृतपणे स्वतः लाल बहादूर शास्ञी विद्यालय कासराळी या ठिकाणी अनाधिकृतपणे प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरु केल्याने भाजपा ‘ कार्यकर्त्यांचे अजेंडा लक्षात येत आहे ही या ठिकाणी बोलल्या जात होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या