चेहऱ्यावरील हास्य हीच तुमची संपत्ती – रविकांत शिंदे !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य टिकवून ठेवले पाहिजे. आपल्या चेहऱ्यावरील हास्य हीच आपली संपत्ती आहे असे प्रतिपादन कै. गंगाबाई पोतना सब्बनवार मुलींचे हायस्कूल कुंडलवाडी येथील इंग्रजी विषयाचे शिक्षक तथा जल्लाद या नवोदित कादंबरीचे लेखक रविकांत शिंदे यांनी केले.
येथील मिलिंद विद्यालयात रविकांत शिंदे यांचे नुकतेच नांदेड येथे एका कार्यक्रमात जल्लाद या त्यांच्या नवीन इंग्रजी कादंबरीचे प्रकाशन झाल्यानंतर आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात सत्कार मूर्ती म्हणून ते बोलत होते.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ .एम. एस. खंदारे या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. पांचाळ ,ज्येष्ठ शिक्षक आर.डी. नरावाड,सुभाष दरबस्तेवार, एस. बी. हाळीखेडे आदी उपस्थित होते. पुढे सत्काराला उतर देताना शिंदे म्हणाले की, चूक ही माणसाच्या हातूनच घडत असते.तेव्हा आपली चूक आपल्याला दुरुस्त करता आली पाहिजे.
तसेच आपल्याजवळ कोणतेही काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असली पाहिजे. आत्मविश्वास ही तेवढेच महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासासोबत संवेदनशीलही बनले पाहिजे. बोधक मानसिकता ठेवू नये. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. तरच इतर लोक आपल्यावर विश्वास ठेवतील. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ. एम .एस. खंदारे, सुभाष दरबस्तेवार, एस.बी.हाळीखेडे यांचेही भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चंदनकर, प्रास्ताविक अमरदीप दगडे तर उपस्थितांचे आभार सौ.एस.आर.तेलगाणे यांनी मानले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या