म्हसळा शाखा अंनिस मार्फत सर्प विज्ञान कार्यक्रम भापट येथे संपन्न !

[ रायगड / म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
म्हसळा ११ आॅगस्ट २०२२ रोजी मु भापट ता म्हसळा येथे महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हसळा जि रायगड आणि सर्प मित्र यांच्या सहकार्याने सर्प विज्ञान हा समज गैरसमज मार्गदर्शनाचा कार्यक्रम नियोजित पार पडला.

यावेळी ज़िल्हा कार्याध्यक्ष विनयकुमार सोनवणे यांनी सापा बद्दल च्या अनेक समज कसे चुकीचे आहेत या बद्दल सविस्तर माहिती दिली तर सर्प मित्र वैभव कदम यांनी अनेक जिवंत साप दाखवून त्यांची माहिती दिली तसेच पर्यावरण संवर्धन साठी साप मारु नका, चुकीचे अघोरीं उपचार करू नका असे आवाहन केले.
यावेळी सर्प मित्र सुमित म्हशीळकर, अक्षय दिवेकर, वेदांत पाटील, मिहीर भानुशाली, संयोग गोरेगावकर, मित दिवेकर हे देखील उपस्थित होते. म्हसळा शाखेचा वतीने सर्व सर्प मित्र यांना अनिप अंक भेट देऊन प्रधान सचिव प्रमोद भांजी यांनी स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन म्हसळा शाखा कार्याध्यक्ष जयसिंग बेटकर यांनी केले. तर म्हसळा शाखा प्रधान सचिव प्रमोद भांजी, विविध उपक्रम कार्यवाह संभाजी शिंदे यांनी देखील माहिती सांगितली. यावेळी भापट गाव अध्यक्ष प्रवीण ठोंबरे, बेटकर, नथुराम घडशी सर्व महिला, ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. कार्यक्रम संपल्या नंतर सर्व साप जवळच्या जंगलात सोडण्यात आले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या