मिलिंद विद्यालयातील कु. स्नेहल चव्हाण चे डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कांबळे ]
        येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद विद्यालयात इयत्ता नववी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. स्नेहल संतोषराव चव्हाण हिने नुकतेच डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक या स्पर्धा परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थी म्हणून यश प्राप्त केलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षात ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन सायन्स टॅलेंट सर्च कॉम्पिटिशन च्या वतीने डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
या परीक्षेत येथील मिलिंद विद्यालयाची इयत्ता नववी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. स्नेहल संतोषराव चव्हाण ही या स्पर्धा परीक्षेत गुणवत्ताधारक ठरली आहे. ती पत्रकार संतोष प्रल्हादराव चव्हाण यांची सुकन्या आहे .तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एम. एस .खंदारे,डॉ. प्रशांत सबनवार,प्रा.अरविंद बोधनकर, पत्रकार कल्याण गायकवाड, सहशिक्षक संतोष चंदनकर,नागनाथ कोलंबरे, गजानन येपूरवार, राजेश कळसाईत, डॉ. तानाजी सूर्यवंशी यांच्यासहित शहर विकास कृती समितीचे सर्व सदस्य व मिलिंद विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कु. स्नेहल चव्हाण हिचे अभिनंदन व कौतुक केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या