नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निळकंठ पाटील जाधव यांची नायगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी निवड !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
नायगाव तालुका सोशल मीडियाच्या तालुकाध्यक्ष पदी निळकंठ पाटील जाधव मोकासदरेकर यांची माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत निवड केली.
नांदेड येथे काँग्रेस पक्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
काँग्रेस कमिटीच्या नायगाव तालुका सोशल मीडिया प्रमुख पदी निळकंठ पाटील जाधव यांची नियुक्तीचे नियुक्तीपत्र माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी माजी पालकमंत्री डी पी सावंत, माजी आमदार महानगर अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदरावजी शिंदे नागेलीकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीपराव पाटील बेटमोगरेकर, मारोतराव कवळे गुरुजी, मार्केट कमिटी सभापती संजय देशमुख लहानकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तिरुपती पाटील कोंढेकर, बाळकृष्ण शिंदे सह नांदेड जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या