सोसायटीच्या शिष्टमंडळानी घेतली सहकार राज्यमंत्र्याची भेट !

• उपसा जलसिंचन योजनेची कर्जमाफी होण्याची आशा पल्लवित

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी अंतर्गत असलेल्या उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जाचे शेतकऱ्यांचा सातबारा वरील थकबाकी माफीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे,राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री अशोकराव चव्हाण ,माजी मंत्री डी पी सावंत आ.अमरनाथ राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सतत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर दिनांक 17 नोव्हेंबर 2021 रोजी राज्याचे सहकार राज्यमंत्री मा. विश्वजीत कदम यांच्या मंत्रालयातील दालनात एक बैठक पार पडली,यात मा. विश्वजीत कदम साहेबांनी सर्व माहिती ऐकून घेतल्यावर संबंधित विषयाबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांना जलसिंचन योजनेच्या कर्जाची थकबाकी कसे निरलेखित करता येईल यासाठी इतिवृत्तांत (प्रोसेडिंग) लिहण्याचे आदेश दिले आहेत, यावेळी या बैठकीस मंत्रालयीन अधिकारी मा. वाडेकर साहेब, गावकर साहेब,राहुल शिंदे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र राज्य व नांदेड जिल्ह्याचे उपनिबंधक मुकेश बारहाते तसेच सेवा सहकारी सोसायटीचे प्रभारी चेअरमन सय्याराम नरावाड, माजी नगराध्यक्ष डॉ एस एस शेंगुलवार, संस्थेचे मॅनेजर राम रत्नागिरे सदर बैठकीस उपस्थित होते. मा. विश्वजीत कदम यांनी कर्जमाफी बाबत इतिवृत्तांत लिहण्याचे आदेश दिल्याने उपसा जलसिंचन योजनेची कर्जमाफी होण्याची आशा निर्माण झाली आहे….
www.massmaharashtra.com

सबस्क्राईब करा.Subscribe

ताज्या बातम्या