कुंडलवाडी सोसायटी निवडणूक; २५ उमेदवार रिंगणात !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी- अमरनाथ कांबळे ]
कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक १६ एप्रिल रोजी होणार असून यासाठी ५८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख ५ एप्रिल पर्यंत होती.५ एप्रिल रोजी ३३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात १३ संचालक पदासाठी २५ इतके उमेदवार राहणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आर.जी.उल्लेवार देगलूरकर व सहायक निवडणूक अधिकारी एल.व्ही. देशपांडे यांनी दैनिक सकाळशी बोलताना दिली.
कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या १३ संचालक पदाच्या निवडीसाठी १६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी ५८ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली होती.छाननी दरम्यान ५८ नामनिर्देशन पत्रेही वैध ठरविण्यात आले होती.
नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यासाठी ५ एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती.५ एप्रिल रोजी ३३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यात आल्याने प्रत्यक्ष २५ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. काँग्रेस प्रणित व भाजप प्रणित पॅनल मध्ये सरळ लढत होणार असून निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक असल्याने तसेच काँग्रेस प्रणित व भाजप प्रणित पॅनल कडून उमेदवारी निश्चिती झाल्याने निवडणुकीच्या प्रचाराचा रंग भरणार आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या