सैन्य दलातून सेवानिवृत्त धम्मपाल कांबळे बेळकोणीकर यांचा धर्माबादेत भव्य नागरी सत्कार !
[धर्माबाद (ता.प्र) – चंद्रभीम हौजेकर]
भारतीय सीमा सुरक्षा दलात 21 वर्षाची सेवा करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत नागेश कांबळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव धम्मपाल कांबळे बेळकोणीकर हे सेवानिवृत्ती झाले आहेत.
त्यानिमित्ताने त्यांचा धर्माबाद मधील माहेश्वरी भवनात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आंबेडकरी चळवळीचे नेते सुरेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
नियोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तेलंगाणा राज्याचे एससी फाॅर एससी राईटस् चे संस्थापक अध्यक्ष एम.सायलू म्हैसेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धर्माबाद नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे, सा. ना. भालेराव, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उप प्राचार्य डॉ.पंढरीनाथ थोटे, ज्यांचे सुपुत्र नुकतेच जिल्हाधिकारी झाले असे पत्रकार दत्ताहरी धोत्रे, वीरभद्र पाटील हंपोले, दयानंद वाघमारे, शिवाजी दामोदर, अंबादास हनुमंते, गौतम मस्के, चंद्रमुणी कांबळे, तेलंगाणा राज्याचे म्हैसा पंचायत समितीचे माजी सदस्य शंकर चंद्रे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गणेश गिरी, शिवाभाऊ मोकले, उपक्रमशील शिक्षक शिवकुमार पाटील, पत्रकार शिवराज गाडीवान, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी धर्माबाद वासियांनी सेवानिवृत्त जवान धम्मपाल कांबळे व त्यांच्या सुविद्य पत्नी नागेशा यांचा भव्य नागरी सत्कार केला.
या कार्यक्रमात सैन्यात असलेले जवान राजू हनुमंते यांच्या पत्नी सुजाता हणमंते यांनी सैनिकावर भावस्पर्शी गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.पी. मिसाळे यांनी केले तर आभार नागेश कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मपाल कांबळे यांनी केले तर नियोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर पत्रकार बांधव ज्येष्ठ नागरिक अनेक पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून.