सैन्यातील जवान देशाचे भूषण – रोटी फाउंडेशन चे शिवानंद पांचाळ नायगांवकर !

दिवाळी सणाच्या निमित्त भारतीय सैन्य दलातील जवान मा.तेलंग नागनाथ पांडूरंग यांचा शिवानंद पांचाळ यांच्या संपर्क कार्यालयात विश्वकर्मा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद पोद्दार तळणीकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून मिठाई भरून सत्कार- गौरव व सन्मान करण्यात आला.
स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता जिवाची बाजी लावून तुम्ही देशाची मान गर्वाने उंचावता, देशाच्या संरक्षणासाठी तुम्ही लढता, तुमच्या कार्याची कुणीही किंमत करू शकत नाही, देशसेवेचे स्वप्न साकारण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतले आहे, त्याचा आम्हा सर्व देशवासियांना अभिमान आहे, नांदेड जिल्ह्यासह नायगांव तालुक्याच्या मातीतील‌ तरुण बांधव देशसेवेत जात आहेत, ही‌ कौतुकास्पद बाब आहे, सैनिक बांधवांनो तुम्ही देशासाठी हिऱ्यापेक्षा मौल्यवान आणि भारताचे भूषणही आहात, भारतीय जवानामुळे आम्ही सर्वजण जीवन सुखी समाधानाने जगत आहोत असे मत रोटी फाउंडेशन चे मराठवाडा अध्यक्ष – शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी व्यक्त केले.
नायगांव तालुक्यातील पिंपळगांवचे ‌ भूमिपुत्र असलेले भारतीय जवान विश्वकर्मा समाजातील युवकांचे प्रेरणास्थान मा.तेलंग नागनाथ पांडुरंग म्हणाले दिवाळी सणाच्या निमित्त माझा आपुलकीने विश्वकर्मा समाजाच्या वतीने सन्मान झाला याचा गर्व नक्कीच आहे. भारतीय सैन्य दलात ( बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ) B.S.F कर्तव्यदक्ष सेवा देत आहोत. मी करत असलेल्या देशसेवेला वीस वर्षे पूर्ण झाले असून सध्या माझ्या नोकरीचे ठिकाण जम्मू आणि काश्मिर, पंजाब, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, ओरिसा नक्षली एरिया, केरळ येथे कर्तव्यदक्ष सेवा बजावत आहे. याचा मला अभिमानही आहे, असे मत व्यक्त केले, यावेळी फुलारी समाजातील सक्रिय कार्यकर्ते सचिन सुरेशराव फुलारी, गोविंद पोद्दार तळणीकर, शिवानंद पांचाळ नायगांवकर, सुभाष पोतदार बेटक-बिलोलीकर बंडू पांचाळ, अमृतनगर माधव पांचाळ , राहुल पांचाळ, पिंटू पोतदार उमरीकर, विश्वकर्मा समाजातील सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते. जवान मा.तेलंग नागनाथ पांडूरंग यांचावर अनेक विश्वकर्मा बांधवांनी शुभेच्छांचा वर्षाव पांचाळ यांच्या संपर्क कार्यालयात केला.

ताज्या बातम्या