परभणी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीशिल्पाची विटंबना झाल्यानंतर तेथे झालेल्या लाठी हल्यात आंदोलक सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी (35) या युवकाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्या संदर्भाने 16 डिसेंबर रोजी नायगांव बंदचे आवाहन करण्यात आले होते.
विविध सामाजिक संघटनेच्या वतिने पोलिस निरिक्षक नायगांव यांना दिलेल्या निवेदनानुसार 10 डिसेंबर रोजी परभणी येथे आंदोलक सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी या आंदोलकाला मारहाण झाली. सोमनाथ सुर्यवंशी हा विधी शाखेचा विद्यार्थी आहे. पोलीसांच्या थर्ड डिग्री मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला आहे. त्या ठिकाणी महिला आंदोलकांचे डोके फुटले आहेत. महिलांच्या हातापायाला फक्चर झाले आहे. परभणी पोलीसांच्या पार्श्वमानसिकतेच्या विरुध्द उद्या दि. 16 डिसेंबर रोजी नायगांव बंदचे आवाहन करण्यात आले होतेया बंद मध्ये व्यापारी, उद्दोजक छोटे व्यावसाईक यांनी कडकडीत बंद ठेवून सहकार्य केले विद्यार्थ्यांची परिक्षा, रुग्णालय आणि औषधी दुकाने यांना बंद मधून वगळ्यात आले होते.
परभणी येथे दलितवस्तीमध्ये गस्त घालणार्या सर्व पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांवर ऍट्रॉसिटी आणि बीएनएस कायद्यातील कलम 106 प्रमाणे गुन्हा नोंदवावा. परभणीचे पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी, एलसीबीचे पोलीस निरिक्षक आणि संबंधीत पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना कायमस्वरुपी निलंबित करावे. मरण पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबियांना 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि त्यांच्या कुटूंबातील दोन सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी अशा मागण्या या निवेदनात आहेत.बंद यशस्वी करण्यासाठी प्रविण भालेराव.प्रकाश कामळजकर.कपिल डुमणे.धम्मदिप भद्रे.साईनाथ देवकांबळे..बंटी नायगांवकर.गणेश भालेरावअविनाश गायकवाड .सिद्धांत गजभारे.अजय आढाव.राजेंद्र कांबळे.नागेश भालके माधव गायकवाड .साईनाथ नामवाडे.आदींनी परिश्रम घेतले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy