सोमठाणा ग्रा.पं.च्या सरपंचपदी प्रयागबाई बळीराम पा. कदम यांची बिनविरोध निवड

सन २०१५ मध्ये सोमठाणा ग्रामस्थांनी कदम घरण्यावर विश्वास दाखवून सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत १३ पैकी १३ संचालक निवडून देऊन चेअरमन पदी बळीराम नागोजी पा. कदम यांनी निवड करून सोसायटीची एक हाती सत्ता दिली होती. त्यात अजून एक जबाबदारी देत अडीच वर्षांखाली पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावकऱ्यांनी ९ पैकी ९ उमेदवार निवडून देऊन पुन्हा एकदा ग्रामस्थांनी विश्वास दाखवून माझी आई सौ प्रयागबाई बळीराम कदम यांची सोमठाणा ग्रा.पं. च्या सरपंच पदी बिनविरोध निवड करून सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे सर्वांचे आभार मानून गावाचा सर्वांगीण विकासासह गावकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सरपंच प्रतिनिधी म्हणून माझे लहान बंधू परमेश्वर पा.कदम हे कार्यतत्पर राहणार आहे.
अ‍ॅड श्रीहरी पा.कदम सोमठाणकर 
[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
  तालुक्यातील सोमठाणा ग्रामपंचायतची निवडणूक गेल्या अडीच वर्षाखाली पार पडल्यानंतर सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित होते. या पदाचे दोन उमेदवार चांगुणाबाई शंकर कदम व सौ. प्रयागबाई बळीराम कदम हे निवडून आल्यानंतर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी दोन्ही उमेदवारांना अडीच-अडीच वर्षासाठी सरपंच पदासाठी नेमणूक करण्याचे ठरले होते. प्रक्रिया ठरल्या प्रमाणे तत्कालीन सरपंच यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर सर्व सदस्यांनी माजी चेअरमन बळीराम पा.कदम यांच्या नेतृत्वाखाली सौ प्रयागबाई बळीराम कदम यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

             कदम पाटील सोमठाणकर घराण्याचे आधारस्तंभ असलेले सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी भगवानराव नागोजी पा. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एकहाती सत्ता खेचून आणून कदम पा.घराण्याने एक इतिहास निर्माण केला आहे. त्यामुळे सोमठाणा नगरीतील सर्वांचे आशिर्वाद, साथ, पाठबळ कायम पाठीशी असेच रहावे असे सांगत सर्वांचे आभार अँड कदम पा.सोमठाणकर यांनी मानले आहे.
            तत्कालीन सरपंच यांची अडीच वर्षाच्या सरपंच पदाची मुदत संपल्यानंतर नूतन सरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पाडण्यासाठी नायगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कानोडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले तर ग्रा.पं.सदस्य चांगुणाबाई शंकर कदम, विलास साहेबराव कदम , उत्तम रामजी देवदे, गोदावरी अवधूत कदम, राहुबाई मारोती तेलंगे , अहिल्याबाई सतबा गायकवाड, जनाबाई पंडित सिरसे, आम्रपाली बाळासाहेब कांबळे आदी ग्रा.पं.सदस्यांनी सौ प्रयागबाई बळीराम कदम यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कानोडे यांनी घोषित केल्यामुळे ग्रामस्थांनी सोमठाणा गावची एकहाती सत्ता कदम घराण्याकडे देऊन मोठेपणा राखला आहे.
        याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी कानोडे, ग्रामविकास अधिकारी केते, अशोक पा.शिंदे, मारोती पा.कदम, नामदेव पा. शिंदे , लक्ष्मण गायकवाड, रावसाहेब पा. शिंदे, प्रभुराम पा.कदम , संजय पा.शिंदे , परशराम शिंदे , गणपत धोपटे ,चक्रधर पा.कदम , संदीप पा.कदम, संदीप पा.शिंदे , पांढरी पा.कदम, विजय मुक्ते पवार , शिवाजी पा.कदम, सुभाष पा.कदम, साईनाथ पा.कदम , सुनील पा. शिंदे , गजानन पा.शिंदे , मारोती पा.कदम , संतोष अलुरे , सतिश शास्त्री , सुरेश पा.कवळे, शंकर सिरसे, पंडित सिरसे , बाळासाहेब कांबळे , साम्राट किशनराव सिरसे, मंजित शेषराव सिरसे , भुजंग पा.कदम, प्रभाकर पा.आलूरे , बालाजी पा.शिंदे , अलकबाई कवळे, शब्बीर शेख , इलाई शेख आदींसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
 www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या