सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयाचे दहावीचा निकाल शंभर टक्के !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
हुनगुंदा येथील सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयाचे दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात कु.जामदार ऋतूजा बळीराम 92 टक्के घेऊन विद्यालयातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर कु. सोलगे कोमल शंकर 90 टक्के घेऊन द्वितीय आली आहे.
कु. प्याटेकर योगेश्री नागनाथ 88.40 टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावली आहे. या परिक्षेत तेहतीस पैकी तेहतीस विद्यार्थी पास झाले आहेत. यात विशेष प्रावीण्य 17 तर प्रथम श्रेणीत 15 द्वितीय श्रेणीत 01 विद्यार्थी उतीर्ण झाला आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार गंगारामजी ठक्करवाड, संस्थेचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड, संचालक अॅड विलासराव कुलकर्णी, मुख्याध्यापक बी.बी.जिंकले, सहशिक्षक डी.एस.बोडके, बी. एस. गुरुडे, सौ.एम.डी.सोमवंशी, एस.डी.देगावे, यू.व्ही.भाले, एम.एन.आकुलवार, एन.जी.लोलापोड, एस.एस.म्याकलवार, आर. एम.म्याकलोड आदींनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या