पनवेल एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस सह अमृतसर एक्स्प्रेस, रामेश्वर एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम एक्स्प्रेस पुन्हा सुरु !

दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालय, नांदेड
प्रेस नोट – 37 , दिनांक – 01.07.2021
( विशेष प्रतिनिधी  – चंद्रभीम हौजेकर )
कोरोना च्या दुसऱ्या लाटेत प्रवासी संख्या कमी झाल्यामुळे काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या. त्यातील बहुतांश रेल्वे गाड्या पुन्हा प्रवाशांच्या सेवेत जुलै महिन्यापासून सुरु होणार आहेत. यात नांदेड-पनवेल एक्स्प्रेस, आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, रामेश्वरम एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम एक्सप्रेस जुलै महिन्याच्या पहिल्यात आठवड्यात सुरु होणार आहेत. आज दिनांक १ जुलै पासून नांदेड ते पनवेल एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत सुरु झाली आहे. तसेच आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस उद्या दिनांक २ जुलै पासून सुरु होणार आहे. या सोबतच जनशताब्दी एक्स्प्रेस, निजामुद्दीन एक्स्प्रेस, बंगलोर एक्स्प्रेस, जम्मू तावी एक्स्प्रेस, संत्रा गच्ची एक्स्प्रेस, जयपूर एक्स्प्रेस, इत्यादी महत्वाच्या रेल्वे गाड्या या पूर्वीच सुरु झाल्या आहेत.. या गाड्या पुढील प्रमाणे सुरु होत आहेत :

1. गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पनवेल विशेष गाडी : हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दिनांक १ जुलै पासून नियमित सुरु होत आहे.
2. गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी : हि गाडी पनवेल रेल्वे स्थानकावरून दिनांक २ जुलै पासून नियमित सुरु होत आहे.
3. मुंबई सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस: गाडी संख्या ०११४१ मुंबई सी.एस.टी.एम. ते आदिलाबाद नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस मुंबई सी.एस.एम.टी. येथून
दिनांक ०१ जुले , २०२१ पासून धावणार आहे.
4. आदिलाबाद ते मुंबई नंदिग्राम विशेष : गाडी संख्या ०११४२ आदिलाबाद ते मुंबई सी.एस.टी.एम. नंदिग्राम विशेष एक्स्प्रेस येथून दिनांक ०२ जुले, २०२१ पासून धावणार आहे.
5. गाडी संख्या ०४६९२ अमृतसर ते हुजूर साहिब नांदेड (सोमवारी) : हि गाडी अमृतसर येथून दिनांक ५ जुलै २०२१ रोजी दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि जालंधर, लुधियाना, न्यू दिल्ली, झांसी, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री
२१.४० वाजता पोहोचेल.
6. गाडी संख्या ०४६९१ हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर (बुधवारी) : हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर दिनांक ०७ जुलै २०२१ पासून दुपारी ११.०५ वाजता सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अमृतसर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १८.३० वाजता पोहोचेल.
7. गाड़ी संख्या ०१४०४ कोल्हापुर ते नागपुर विशेष एक्स्प्रेस दिनांक ०२ जुले पासून कोल्हापुर ते नागपुर अशी धावणार आहे
8. गाड़ी संख्या ०१४०३ नागपुर ते कोल्हापुर विशेष एक्स्प्रेस दिनांक ०३ जुले पासून नागपुर ते कोल्हापुर अशी धावणार आहे.
9. गाडी संख्या ०६७३३ रामेश्वरम ते ओखा विशेष गाडी: हि गाडी रामेश्वरम येथून दिनांक २ जुलै पासून दिनांक ५ नोव्हेंबर पर्यंत नियमित सुरु होत आहे.
10. गाडी संख्या ०६७३४ ओखा ते रामेश्वरम विशेष गाडी: हि गाडी दिनांक ०६ जुलै पासून दिनांक ९ नोव्हेंबर पर्यंत नियमित सुरु होत आहे.

11. गाडी संख्या ०८५६५ विशाखापट्टणम ते नांदेड विशेष गाडी (त्री -साप्ताहिक) : हि गाडी विशाखापट्टणम येथून दर मंगळवारी, बुधवारी आणि शनिवारी दिनांक १० जुलै पासून रात्री २०.०० वाजता सुटून राजमुंद्री, काझीपेत, सिकंदराबाद, निझामाबाद मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १३.३४ वाजता पोहोचणार आहे.
12. गाडी संख्या ०८५६६ नांदेड ते विशाखापट्टणम विशेष गाडी (त्री -साप्ताहिक) : हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून दर बुधवारी, गुरुवारी आणि रविवारी दिनांक ११ जुलै पासून दुपारी १६.३५ वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद, काझीपेत मार्गे विशाखापट्टणम येथे दिवशी सकाळी ०९.१५ वाजता पोहोचेल.
जनसंपर्क कार्यालय, नांदेड
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या