नरसीच्या सरपंचाचा स्तुत्य उपक्रम ; ऑनलाईन सुविधा, संपुर्ण गावाला संदेश पोहचण्यासाठी स्पिकर बसवले.

[ नायगाव बा. तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील. नरसीचे सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे यांच्या संकल्पनेतुन नरसी विविध उपक्रमतुन विकासाच्या भरभराठीसह आजुन एक तुरा करभरण्याची आँनलाईन सुविधेसह संपूर्ण गावात एकाचवेळी संदेश पोहचण्यासाठी स्पिकरची व्यवस्था करण्यात आली.
        चार महामार्गावर आणि दोन राज्याच्या सिमेसलगत तर नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी जवळपास पंचवीस हजाराच्या वर लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत असलेल्या नरसी ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून गजानन शिवाजीराव भिलवंडे यांनी अडिच वर्षाच्या कालावधीत गावातील रस्ते , नाल्या , तसेच “स्वच्छ नरसी सुंदर नरसी” घंटागाडी ची व्यवस्था , कायमस्वरूपी फिल्टर पाण्याची नळयोजनेचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे , गावातील शिक्षण व्यवस्थेला टेबल खुर्ची सह फिल्टर व्यवस्था करण्यात आले. यासह गावातील सर्वच अंगणवाडीला वाटर कँन, ग्लास , टेबल खुर्च्या पुरवठा केले, झाडे लावा झाडे जगवा मोहीम, राबविण्यात येत आहे.
    आपल्या गावातील नागरिकांना कोणताही कर भरायचा असल्यास तो आता नगदी स्वरुपात न भरता आँनलाईन पध्दतीने भरण्याची व्यवस्था ही करण्यात आली असुन .नरसी गावचा भौगोलिक आलेख पहाता पूर्व पश्चिम चार कि.मी. तर दक्षिण उत्तर चार कि.मी .आहे. गावातील कोणतेही राष्ट्रीय कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंत्या, धार्मिक कार्यक्रम, दुखःद घटना ईत्यादी गावातील सर्व नागरिकांना एकाच वेळी समजली पाहिजे म्हणून येत्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन स्पिकरची सुविधा करुन गावात व नरसीफाट्यावर भोंगे बसविण्यात आले आहेत.
     नागरिकांना कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा, विविध कार्यक्रमाचा संदेश उपक्रम राबवणारी नरसीची ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिलीच असेल. नरसीच्या सर्वांगीण विकासासाठी. व शासनाच्या ज्या काही योजना येतील त्या कसल्याही प्रकारचे राजकारण न आणता नियोजन बध्द पध्दतीने राबवून विकासाभिमुख नरसी म्हणून सर्वांना दिसली पाहिजे .असे मत सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे यांनी व्यक्त केल. असे ग्रामविकास अधिकारी नागेश यरसनवार यांनी माहिती देताना सांगितले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या