जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथे आज कै.मातोश्री गिताबाई धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी- गजानन चौधरी ]
जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथे आज कै.मातोश्री गिताबाई धर्माधिकारी यांच्या पावन स्मृती दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, मातोश्री गिताबाई धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक इरन्ना काका कंडापल्ले, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी बरबडेकर, संस्थेचे जेष्ठ संचालक माजी प्राचार्य व्हि.टी.सुरेवाड सर, संचालक शिवाजीराव धर्माधिकारी बरबडेकर, संचालक जगदिशराव धर्माधिकारी बरबडेकर, सह सचिव प्रा.सुदर्शन धर्माधिकारी बरबडेकर शाळेचे पर्यवेक्षक सुर्यकांत फड सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
   वक्तृत्व स्पर्धेत प्रथम, व्दितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आलेवाड मैडम यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता संतोष पचलिंग सर व एन.टी तिप्पलवाड सर यांच्या सुमधूर गायनाने करण्यात आली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या