आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सायरेड्डी ठक्कुरवाड सन्मानित !

कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
    बिलोली तालुक्यातील आंतर भारती शिक्षण संस्थे अंतर्गत असलेल्या पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय येथे सहशिक्षक पदावर कार्यरत असलेले सायरेड्डी राजाराम ठक्कुरवाड यांना संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी येथील एका कार्यक्रमात तालुकास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
         संस्कृती संवर्धन मंडळ शारदानगर सगरोळी येथील एकलव्य क्रीडा अकादमी व पंचायत समिती बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी बिलोली तालुक्यातील जवळपास दहा शिक्षकांना तालुकास्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले. पूज्य साने गुरुजी प्राथमिक विद्यालय बिलोली येथील सहशिक्षक सायरेड्डी ठक्कुरवाड यांनी दरवर्षी पावसाळी क्रीडा स्पर्धेत शाळेतील विध्यार्थ्यांना सहभागी करून शाळेला अनेक वेळा यश संपादन करून दिले,त्यांनी दिलेल्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना तालुकास्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
          सदरील पुरस्कार सोहळा 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून सगरोळी येथे संस्कृती संवर्धन मंडळ शारदा नगर येथील गॅलेक्सी सभागृह कृषी विज्ञान केंद्रात थाटात संपन्न झाला. सदरील पुरस्कार नांदेड येथील प्रसिद्ध उद्योगपती किशोर भाई सुरतवाले, संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख ,संस्थेचे सचिव डॉ. जयंत नकाते यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला. ठक्कुरवाड यांना आदर्श क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गंगाधरराव पटने, सचिव चंद्रशेखर पाटील सावळीकर, सहसचिव तथा मुख्याध्यापिका जयमाला पटने,मुख्याध्यापक विठ्ठल चंदनकर आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या