कुंडलवाडीत अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करणे सुरू

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अतिमूसळधार व संततधार पावसामुळे अनेक घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आल्यामुळे प्रशासनाने तात्काळ पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी प्रशासनाकडे केली होती,या मागणीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन शहरात पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यास सुरुवात केले आहे.

कुंडलवाडी शहरात गेल्या पाच दिवसापासून संततधार व मुसळधार पासून पडत असून या पावसात शहरातील आंबेडकर नगर,साठे नगर,वंजार गल्ली आदी शहरातील नागरिकांच्या घरांची पडझड झाली होती,त्यामध्ये आंबेडकर नगर येथील देविदास विठ्ठल येलमे,सुरेश विठ्ठल येलमे,साठे नगरअंजनबाई मोहन कंपाळे, सचिन चांदू कंपाळे,वंजार गल्ली निर्मलाबाई संग्राम नवाथे,व्यंकट पोतोजी हमंद,भागाबाई कानकट्टे,यांच्या टिन शेड,कवेळीच्या घरांची पडझड होऊन घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संसार उघड्यावर पडले होते.

पडझड झालेल्या घरांची तात्काळ पंचनामे करून शासन स्तरावरून नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने युवक शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी प्रशासनाकडे केली होती, या मागणीची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दिनांक 28 रोजी प्रशासनाच्या वतीने तलाठी पवन ठकरोड,सायलू बंटावार यांनी यांनी अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे लवकरच नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई मिळणार आहे.तात्काळ पंचनामे केल्याबद्दल प्रभारी मुख्याधिकारी आर जी चव्हाण,तलाठी पवन ठकरोड आदी कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या