नसोसवायएफच्या मागणीला विद्यापीठ प्रशासनाकडून दखल ! सर्व अभ्यासक्रमाच्या दहा पेक्षा अधिक जागा वाढल्या !
( नांदेड जिल्हा प्रतिनिधी- आनंद सुर्यवंशी )
पदव्युत्तर अभ्यासक्रमातील जागा वाढून देण्यात याव्या या मागणीवर जोर धरून नॅशनल एसी एसटी ओबीसी स्टुडंन्ट अँड युथ फ्रंटने २३ जानेवारी रोजी विद्यापीठ गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. नसोसवायफच्या या मागणीची विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ दाखल घेत सर्व पदव्युत्तर पदवी
अभ्यासक्रमातील दहा पेक्षा अधिक जागा वाढून दिल्याने नसोसवायएफने जोर धरलेल्या या मागणीचे विद्यार्थी व पालकातून नसोसवायएफचे सर्वस्थरातून कौतुक करण्यात येत आहे.
दिनांक २३ रोजी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्यात याव्या या मागणीसाठी नसोसवायएफने विद्यापीठगेटसमोर उपोषण केले असता याची तात्काळ दखल घेत नांदेड, परभणी, हिंगोली,लातूर या चार जिल्ह्यातील पदव्युत्तर पदवी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मधील पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी दुपटी पेक्षा अधिक प्रमाणात आहे.पण पदव्युत्तर पदवी अभ्याक्रमाच्या जागा अपुऱ्या असल्याने नांदेड,परभणी,हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार होते. त्यामुळे या विदयार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील जागा वाढून देण्यात यावे यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली.
पण विद्यापीठ प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर २३ जानेवारी रोजी नसोसवायएफ कडून विद्यापीठ गेटसमोर अमरण उपोषण सुरू केल्याने याची तात्काळ दखल घेत रात्री ८.४५ वाजता कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी विद्यार्थी हिताय या मागणीची दखल घेत अखेरीस विद्यापीठ संकुल व संलग्नित महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील दहा पेक्षा अधिक जागा वाढून देण्यात येतील असे चर्चेदरम्यान झालेल्या सकारात्मक ठरावातून या मागणी संदर्भात अमोरण उपोषणास बसलेले नसोसवायएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.डी.हर्षवर्धन, जिल्हा प्रभारी संदीप जोंधळे,जिल्हा प्रवक्ता संशोधक विद्यार्थी मनोहर सोनकांबळे यांनी रात्री उपोषण सोडले.
या संदर्भात रात्री उशिरापर्यंत नसोसवायएफचे राज्य प्रवक्ता प्रा.सतीश वागरे,जिल्हा अध्यक्ष धम्मा वाढवे, संदीप इंगळे,व्यंकटेश राठोड,संघरत्न धुतराज, विद्यापीठ प्रमुख सागर घोडके,प्रसिद्धी प्रमुख शुभम दिग्रस्कर जिल्हा सेक्रेटरी अक्षय कांबळे दिनेश येरेकर,प्रवीण सावंत,अनुपम सोनाळे गोपाळ वाघमारे, या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्याशी केलेल्या चर्चेतून या जागा वाढून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान नसोसवायएफने अनेक दिवसांपासून जोर धरलेल्या या मागणीस विद्यापीठ प्रशासनाकडून दाखल घेत अखेरीस सर्व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील जागा वाढून दिल्याने पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विदयार्थी व पालकातून नसोसवायफचे सर्व स्थरातून कौतूक करण्यात येत आहे.