कुंडलवाडी भारतीय स्टेट बँकेत पुर्णवेळ शाखा व्यवस्थापक देण्याची मागणी ; ग्राहकांचे प्रभारी मॅनेजरला निवेदन !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
         येथील एस बी आय बँकेत पूर्णवेळ शाखा व्यवस्थापक नसल्याने प्रभारी शाखा व्यवस्थापकाना ग्राहकांना क्रॉप लोन,गोल्ड लोन,घर बांधकाम लोन वाटप करण्याचे आधिकार नसल्याने कुंडलवाडी एस बी आय बँकेच्या ग्राहकांचे लोनची कामे ठप्प झाल्याने ग्राहकांच्या वतीने प्रभारी व्यवस्थापक यांना निवेदन देऊन पूर्णवेळ शाखा व्यवस्थापक देण्याची मागणी केली आहे.
         सविस्तर वृत्त असे की येथील एस बी आय चे शाखा व्यवस्थापक मंगेश सोनुले यांची नांदेडला बदली झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी दिलेले शाखा व्यवस्थापक रूजू न झाल्याने बिलोली येथील कर्मचाऱ्याला कुंडलवाडी एस बी आय बँकेत प्रभारी शाखाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.कायमस्वरूपी शाखा व्यस्थापक आल्या शिवाय क्रॉप लोन,गोल्ड लोन ,घर बांधकाम लोन त्यांना देता येत नसल्यामुळे ग्राहक आर्थिक अडचणीत सापडला आहे.त्यामुळे तात्काळ पूर्णवेळ शाखाधिकारी देण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.  
         या निवेदनावर मारोती पाटील कोटग्याळकर,गंगाधर मलकुवार,युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ प्रशांत सब्बनवार, उमकांत गुंडाळे, संजय हमंद,नागनाथ कोलंबरे,लक्ष्मण पा चटलूरे,विश्वनाथ नागुलवार,शेख जलील, माधवराव मरकंटे,हणमंत आष्टमवार आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत…
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या