कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य नाट्य स्पर्धा होणार कि नाही या संभ्रमात रंगकर्मी असताना १६ नोव्हेंबर रोजी स्पर्धा होणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने जाहीर केले आणि प्रवेशिका १५ डिसेंबर पर्यंत स्विकारणार असल्याचे संघीतले. तब्बल एका वर्षानंतर स्पर्धा होणार असल्याकारणाने स्पर्धकांमध्ये उत्साह निर्माण झाला. आणि नांदेड केंद्रावर परभणी आणि नांदेड मिळून अश्या १८ संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धा संपूर्ण राज्यात १५ जानेवारी पासून सुरवात होईल असे घोषित केल्यामुळे स्पर्धक तयारीला लागले आणि १७ डिसेंबरला पुन्हा कळले कि स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असे काही म्यासेज रंगकर्मींच्या ग्रुपवर येऊन धडकले.
पण यास सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दुजोरा न देता स्पर्धा ठरलेल्या वेळेप्रमाणे संपन्न होणार असे कळवले. रंगकर्मींचा जीव भांड्यात पडला आणि पुन्हा एकदा तयारीला सुरवात झाली. तालमीसाठी जागा भाड्याने मिळवली, नेपथ्यासाठी खर्च केला, कलावंतांची जुळवा जुळव करून तालमीला सुरवात झाली. सर्वांनी आप आपली कामे दूर ठेऊन, तालीम शेवटच्या टप्प्यात आली. सर्वाना तारखांचे वाटप झाले. आणि स्पर्धा सुरु होण्याच्या दोन दिवस आधी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे कळवण्यात आले.
ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधाच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून राज्य नाट्यस्पर्धा तूर्तास पुढे ढकलण्यात यावी, अशी अनेक संघांनी ई मेल द्वारे व दूरध्वनीवरून केलेली विनंती लक्षात घेऊन, येत्या १५ जानेवारी पासून सुरु होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात आल्याचे नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी कळवले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे रंगकर्मीमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. स्पर्धा नेमकी किती कालावधीसाठी पुढे ढकलली या संदर्भात स्पस्प्ष्ठता नसल्या कारणाने तालीम थांबवावी कि चालू ठेवावी हे निश्चित करता येत नाही. महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्के उपस्थितीत नाट्य गृह आणि चित्रपट गृह चालू ठेवण्याची अनुमती दिली असतानी असा निर्णय का घेतला? कोरोना फक्त स्पर्धेतील कलावंताणाच होतो का? व्यावसायिक नाटके, सभा, समारंभ व्यवस्थित चालू असताना हौशी कलावंतांवरच अन्याय का? झालेला तालमीचा खर्च कोण देणार? स्पर्धा पुढे ढकलायची होती तर जाहीर का केल्या? स्पर्धा जाहीर करताना कोरोना नव्हता का? असे अनेक प्रश्न रंगकर्मीं मधून उपस्थित होत आहेत.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy