शिक्षकेतर महामंडळाचे 51 वे राज्यस्तरीय अधिवेशनास शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे – गोपाळराव पेंडकर 

[ कुंडलवाडी प्रतिनिधी-अमरनाथ कुंडलवाडी ]
     महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळाचे ५१ वे राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्र ७ जानेवारी रोजी सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे मंत्री महोदय यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या अधिवेशनासाठी जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नांदेड जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव पेंडकर, महिला राज्य उपाध्यक्षा सौ. सरीता कुलकर्णी यांनी केले आहे.
सावंतवाडी जिल्हा रत्नागिरी येथील सावंतवाडी जिमखाना मैदान येथे होत असलेल्या शिक्षकेत्तर महामंडळ अधिवेशनासाठी शालेय शिक्षणमंत्री ना. दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण, खासदार विनायक राऊत, शिक्षक आमदार विक्रम काळे, आ. जयंत आसगांवर, आ. वैभव नाईक, आ. रवींद्र धंगेकर, आ. नितेश राणे, आ. रमेश पाटील, आ. निरंजन डावखरे, आ. सत्यजित तांबे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार सुधीर सावंत, शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्यासह विविध विभागांचे आमदार, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे काही प्रश्न मार्गी लागले असले तरी अद्याप अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत.
याच अनुषंगाने खुले अधिवेशन व चर्चासत्र होणार असून, या चर्चासत्रात हक्काच्या मागण्या मान्य करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अधिवेशनास उपस्थित रहावे असे आवाहन नांदेड जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळराव पेंडकर यांनी केल आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या