नायगांव येथील पवन गादेवार यांना राज्यस्तरीय आदर्श सेवारत्न पुरस्कार जाहीर !

[ नायगांव बा.ता.प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
 शहरातील युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री पवन गादेवार नायगांवकर यांना नुकताच तुफान क्रांतीच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
त्यांनी गेल्या दोन दशकांपासून समाजसेवेत सदैव अग्रेसर आहेत आर्य वैश्य महासभेच्या महिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख म्हणूनही उत्तम कामगिरी बजावत आहेत त्यांनी अनेक समाजहितासाठी उपक्रम वृक्षारोपण, महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान यांसह सामाजिक उपक्रम राबवतात त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल तुफान क्रांतीने घेतली हा पुरस्कार त्यांना सांगोला येथील अहिल्याबाई होळकर मंगल कार्यालय साकोला येथे वितरीत केला जाणार आहे. गादेवारचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या