राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस अजिंक्यपद स्पर्धेसाठी रायगड संघाची घोषणा !

(म्हसळा ता.प्रतिनिधी प्रा.अंगद कांबळे)

महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशन अंतर्गत व जळगाव जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ८ वी सिनिअर राज्यस्तरीय व ७वी सबज्युनिअर पुरुष व महिला तसेच मुले व मुली राज्यस्तरीय १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान जळगाव येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रायगड जिल्हा संघाची जिल्हास्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेतून प्राविण्य प्राप्त खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत रायगड जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड चाचणीतूनही काही खेळाडूंची निवड करण्यात आली असून जिल्हा संघाची घोषणा रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष तथा पनवेल नगरसेविका सिताताई पाटील, सचिव स्वप्नील वारांगे, निवड चाचणी प्रमुख मंदार मुंबईकर यांनी जाहीर केली.

त्यामध्ये सबज्युनिअर गटात मुलांमध्ये आरुष निट्टूरे, अश्विन प्रभू, सिद्धेश करांडे, आदित्य यादव तर सबज्युनिअर गटात मुलींमध्ये दिक्षा वाल्वे, अहना भूषण यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सिनिअर मुले गटातून यश वारके,निशांत गायकवाड, स्वप्नील वारंगे तसेच सिनिअर गटातून मुलींमध्ये प्रतीक्षा शेकर यांची निवड करण्यात आली आहे.

रायगड सॉफ्ट टेनिस असोसिएशन व सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ज्युनिअर/सबज्युनिअर सॉफ्ट टेनिस स्पर्धा २०२०-२१ रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल खारघर येथे पार पडली.

ताज्या बातम्या