बिलोली – रावधानोरा बसचा अपघात ; कुठलीही जिवीत हानी नाही

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
        बिलोली आगाराची रावधानोरा बस दररोजच्या प्रमाणे रावधानोरा हुन कुंडलवाडीकडे येत असताना पिंपळगाव गावा जवळील गणपती मंदीरच्या शेजारील वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याखाली उतरली असून त्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

            बिलोली आगाराची बिलोली – रावधानोरा बस क्रमांक एम एच 20 डी एल 1903 हि बस नेहमी प्रमाणे कुंडलवाडी,पिंपळगाव मार्गे रावधानोरा ये जा करीत असते दि.8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता रावधानोरा हुन बिलोली कडे जात असताना मौजे पिंपळगाव गावा लगत असलेल्या गणपती मंदिरा शेजारील वळणावर बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या खाली उतरून अपघात झाला आहे.

या अपघातात जवळपास 14 प्रवाश्यांना किरकोळ दुखापत झाली असून सर्व प्रवाश्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी येथे वैद्यकीय अधिकारी डॉ एस एस मोरे यांनी प्रथम उपचार करून घरी पाठवले आहे.

या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.संबंधित घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख सुभाष पवार,सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित कासले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे.
www.massmaharashtra.com