एसटी कर्मचाऱ्यांचे अलिबाग येथे आंदोलन चालू !

[ अलिबाग प्रतिनिधी – अभिप्राव पाटील  ]
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे अलिबाग येथे आंदोलन चालू असून अलिबाग एसटी आगारात मोठ्या संख्येने कर्मचारी काम बंद आंदोलन करीत आहेत. एसटी कामगारांच्या मागण्या ह्या रास्त स्वरूपाच्या असुन कामगारांना पाठिंबा व सहकार्य करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकाना दिल्याचे मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष देवव्रत विष्णु पाटील यांनी अलिबाग आगारातील कामगारांच्या आज दिनांक ०९ नोव्हेंबर रोजीच्या घेतलेल्या बैठकीत वेळी सांगितले.

एसटी कामगारांच्या प्रमुख मागण्या :- 
  • एसटी महामंडळाला राज्यातील खात्याचा दर्जा द्यावा.
  • महामंडळ ऐवजी राज्य सरकार मधे खाते बनवले पाहिजे.
  • महामंडळ व चेयरमन न ठेवता सरळ परिवहनमंत्री असावा.
  • त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी प्रमाणेच एसटी कामगारांना वेतन मिळेल.
  • ज्यामुळे पुन्हा पुन्हा आंदोलन करायची वेळ कामगारांवर येणार नाही.
 मनसेची मागणी आहे की, रायगड जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांनी एसटी कामगारांच्या मागणी समर्थनार्थ तसे पत्र मान. मुख्यमंत्री व मान.राज्यपाल यांना द्यावे. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पालकमंत्री कु.अदितीताई तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविद्र पाटील, आमदार महेंद्र थोरवे, आमदार जयंतभाई पाटील ईत्यादींनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांना पत्र देऊन मंत्रीमंडळाने तसा निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न करावेत, विधानसभा अधिवेशनात ठराव पारीत करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष देवव्रत विष्णु पाटील यांनी अलिबाग अगारातील कामगारांच्या बैठक वेळी केली.
एसटी महामंडळ हे फक्त सरकार ची अमानत नसून जनतेचा त्यात सहभाग आहे म्हणुन कामगारांची व्यथा जनतेने समजुन घेतली पाहिजे हि भावना यावेळी व्यक्त केली. अलिबाग आगारातील कामगारांना भेटण्यास सोबत सौ अश्वीनी कंटक, प्र.पाटील, अनिल कंटक आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या