75 लाख रूपयांच्या निधीवर स्थगिती आली तरीही, अश्वारूढ पुतळा चबुतरा दगडी चिरेबंदी नक्षीकाम स्वखर्चातून वेगात चालू — पुतळा समीती प्रमुख शरद पवार

[ विशेष प्रतिनिधी – रियाज पठान ]
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर होत असलेल्या लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अश्वारूढ पुतळ्याच्या संदर्भातील 75 लाख रूपयांच्या निधीवर सद्याच्या शिंदे-फडवणीस सरकारने स्थगिती आणली तरीही,अश्वारूढ चबुतरा दगडी चिरेबंदी नक्षीकाम स्वखर्चातून वेगात चालू असल्याची प्रतिक्रिया पुतळा समितीचे प्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक शरद पाटील पवार यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या होत असलेल्या कामा संदर्भात जातीने लक्ष देऊन दररोजच आपले आद्य कर्तव्य समजून शरद पाटील पवार पाहणी करतात.  दिनांक १३ आगस्ट २०२२ रोजी शरद पाटील पवार यांच्या सोबत पाहणी करताना यावेळी शिक्षक नेते तथा राजर्षी शाहू पतसंस्थेचे माजी चेअरमन, मुख्याध्यापक बि.वाय.चव्हाण, माजी सैनिक व्यंकटराव घोडके, माजी नगरसेवक उत्तमराव महाबळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताभाऊ शेटे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संजय कहाळेकर यांनी शरद पाटील पवार यांनी स्वखर्चातून चालू असलेल्या प्रगतीपथावरील चिरेबंदी काम पाहुन स्वागतच केले आहे.
यावेळी बोलतांना शरद पाटील पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुत्र उभारणीत कोणतीही राजकारण न आणता सर्वांच्या सहकार्याने काम पूर्णत्वास नेत आहे. सदरील काम प्रगतीपथावर असून पुतळाचबुतरा बांधकाम अगोदर काँक्रीट मध्ये घेऊन नंतर चिरेबंदी कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.
लागणारे दगड होट्टल येथून उन्हाळाभर आणून घडई केली असून एक दगड घडवायला किमान एक दिवस लागतो असून या कामी माळाकोळीचे संतोष नाना तिडके यांचे व बोरी येथील मजुरांचे काम अतिशय मेहनतीने व योग्य रीतीने होत असल्याचेही ते म्हणाले.
तसेच यापुढे बोलताना शरद पाटील पवार म्हणाले की, नांदेडचे तत्कालीन पालकमंत्री तथा अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्हा नियोजन समितीकडून 75 लाख रुपये विकास कामासाठी दिले परंतु सदरील 75 लाख रुपये निधीवर सद्याच्या शिंदे-फडवणीस सरकारने स्थगिती दिल्यामुळे सदरील चालू असलेले काम हे मी स्वतः स्वखर्चातून चालू करत असून येत्या दिवाळीपर्यंत काम पूर्ण होण्याची त्यांना खात्री असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले. लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, सर्व सन्माननीय नगरसेवक यांचे सहकार्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या