पथनाट्य स्पर्धेत के.रामलू पब्लिक स्कूल प्रथम !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
           छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातील मराठा गल्ली सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले याच अनुषंगाने दिनांक 17 रोजी शिव चरित्रावर आधारित पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली,या स्पर्धेत शहरातील के.रामलू पब्लिक स्कूल या शाळेने प्रथम क्रमांक मिळविले तर कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्यालय द्वितीय,शाहू प्राथमिक शाळा तृतीय क्रमांक पटकावले आहे.
यावेळी स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे,माजी सोसायटीचे चेअरमन साईनाथ उत्तरवार, शिवसेना युवासेना जिल्हाध्यक्ष बालाजी शिंदे नागणीकर यांच्यावतीने रोख रक्कम पारितोषिक देण्यात आले.
          यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे,उद्घाटक स्वरूपा शिंदे, प्रमुख पाहुने म्हणून साईनाथ उत्तरवार, बालाजी शिंदे नागणीकर, हणमंलू ईरलावार, साईरेड्डी ठक्कुरवार, डाॅ.प्रशांत सब्बनवार, सयाराम मुक्केरवार, मोहम्मद अफजल, कल्याण गायकवाड, मुकेशकुमार जोशी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता हमंद यांनी केले तर परिक्षण व आभार डाॅ.नरेश बोधनकर यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या