के. रामलु शाळेचा पथनाट्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
कु.वार्ताहर दि. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून के.रामलु शाळेच्या पथसंंचालनात अनेक पथकांसह आदिवासी नृत्य, ग्राम स्वच्छता, लेझीम पथक, डंबेल्स पथक, वारकरीदिंडी ,विविधतेत एकता, तिरंगा रॅलीत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कुंडलवाडीकरांचे लक्ष वेधले.तसेच के. रामलु नाबाद नगराध्यक्ष व्हाट्सअप ग्रुपच्या वतीने आयोजित पथनाट्य स्पर्धेत महिला सक्षमीकरण काळाची गरज या विषयावर आधारित सादर केलेल्या नाटिकेने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या पथसंंचालनातील सहभागी सर्व विद्यार्थी व नाटिकेसाठी मार्गदर्शन करणारे शिक्षिका अर्चना नरोड, रमेश कासलोड आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचे शाळेचे संस्थाध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार संचालिका रमा ठक्कूरवार सचिव यशवंत संगमवार प्राचार्य टी.नरसिंगराव मुख्याध्यापक पापयाआप्पा मठवाले पर्यवेक्षक राजेश कागळे यांनी कौतुक व अभिनंदन केले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या