बिलोली नगर पालिकेकडून पिण्याच्या पाण्याची गैरसोय ; धरणे आंदोलन, आमरण उपोषणाचा महिलांनी दिला इशारा !
■ साठेनगर येथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती
■ बिलोली साठेनगर येथील महिलांना पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई.
[ बिलोली ता.प्र – सुनिल जेठे ]
बिलोली साठेनगर हे मागासवर्गीय दलितवस्ती असलेल्या या भागात मोल मजुरी करणाऱ्याची वसाहत आहे. या साठेनगर मध्ये पिण्याच्या पाण्याची मोटार बंद पडल्याने पाण्याची तिव्र टंचाई भासत आहे.
पालिकेने पिण्याच्या पाण्याची होणारी मोठी गैरसोय दुर करावे,पाणी उपलब्ध करुन द्यावे, म्हणून नगर पालिके समोर धरणे आंदोलन व अमरण उपोषण करणार असल्याचे इशारा महिलांकडून दि.०६ डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे देण्यात आले. साठेनगर मधील नाल्याची साफसफाई करावे,घनकचरा ठेकेदाराचे घंटा गाडी कचरा नेण्यासाठी येत नसल्यामुळे संबंधित ठेकेदारावर फोजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे, म्हणून महिलांकडून पालिकेला बोलल्या जात आहे.
बिलोली नगर पालिकेचे अध्यक्षा सौ.मैथीली कुलकर्णी ह्या आणि उपाध्यक्ष मारोती पटाईत हे नांदेड येथून ये-जा करत असल्यामुळे बिलोली शहरातील नागरिकांना पाण्याच्या पाण्याची,नाल्यासाफसफाई,घनकचरा.लाईट,यासह अदी सुविधा नागरिकांना पोहोचले की नाही याचा थांग पत्ताही नसतो. येथील नगर सेवक, नगरसेविका, अध्यक्ष प्रतिनिधी यांना गुत्तेदारी, टक्केवारी, अवैध रित्या रेती चोरी पासुन वेळ मिळाले तरच येथील नगरवासींना कोणती मुलभुत सुविधा आहेत, की नाही हे पाहण्यासाठी वेळ दिले जात नाही.
येथील पालिकेच्या माध्यमातून कोठ्यावथी व लाखो रुपयाचे निधी योग्य कामासाठी न वापरता अन्य कामासाठी वापर ले जात आहे.असा अरोपही या आंदोलन करत्यांनी केले जात आहे. नगर पालीकेच्या निवडणूकीत नगर सेवक म्हणून निवडून आलेले नगरसेवक आपल्या प्रभागात विकाची कात सोडणार म्हणून स्वप्न दाखवणारा नगरसेवक प्रभागात फिरकतही नाहीत.
यामुळे साठेनगर भागातील महिला पिण्याच्या पाण्यासाठी भाटकंती करावे लागत आहे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मुकिंदर कुडके यांच्या सहकार्याने महिलांनी पालिकेला पाण्यासाठी धरणे आंदोलन व अमरण उपोषण करण्याचे इशारा निवेदनाद्वारे दिला.
या निवेदनावर गुणाबाई एडके, गयाबाई एडके, कमळबाई जेठे, धोंड्याबाई जेठे, गंगाबाइ जेठे, सदुबाई जेठे, राधाबाई जेठे यांनी स्वाक्षरी केली. सदरचे आंदोलनास उपोषणास माजी नगर अध्यक्ष विजयकूमार कुंचनवार यांनी पाठींबा दिला आहे.
www.massmaharashtra.com
युट्युब चॅनल सबस्क्राईब करा.फोटोवर क्लिक करून