विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थीच असतो – पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील बळीराजा गणेश मंडळ आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून नारायण शिंदे पोलीस उपनिरीक्षक हे आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की विद्यार्थी हा जीवनभर विद्यार्थीच असतो तो क्षणाक्षणाला शिकत असतो क्षणाक्षणाला घडत असतो, हेच खरे शिक्षण, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की हसा, खेळा पण आयुष्यात शिस्त पाळा. जरी आज अपयश आलं तरी चालेल उद्याची पहाट ही तुमची आहे या अपयशातून तुम्ही खूप काही शिकायचं असतं असे प्रतिपादन शिंदे यांनी केलं.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. विनोद माहुरे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी हे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शिक्षण हे परिस्थिती बदलण्याची लस आहे असे मार्मंकित शब्दात सांगितलं तसेच आरोग्य शिबिर , मूकबधिर विद्यार्थ्यांना वही पेन वाटप आधी विशेष कार्यक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी अन्य प्रमुख अतिथी म्हणून सौ.गीता ढगे मुख्याध्यापिका यांनी महिला-सबलीकरण व मंडळाच्या चालणाऱ्या कार्यक्रमाचे कौतुक केले. तसेच या कार्यक्रमासाठी पत्रकार नागनाथ कोलंबरे, युवा उद्योजक विलास दिवशीकर , इंजि. किरण बळगारे, साहेबराव देगावे, दोस्ती कन्स्ट्रक्शन चे शिवराम कोलंबरे, नगरसेवक प्रतिनिधी सिणू गोनेलवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सामान्य ज्ञान स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, संगीत खुर्ची, चमचा लिंबू , व्याख्यान माला तसेच गणपती सजावट स्पर्धा , आदी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सर्व यशस्वी स्पर्धकांना अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ.नरेश बोधनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.चंद्रकांत शिंदे यांनी केले कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष रेड्डी पेंटावार, लोकेश भत्ते, माधव होळकर, निखिल पेंटावार, साईराम पेंटावर , अनिल पेंटावार , अशोक कुंचलीकर, योगेश पेंटावार, सतीश पेंटावर तसेच सर्व सदस्य पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली…
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या