लिटल स्टेप च्या विद्यार्थ्यांची एस एस सी बोर्ड परीक्षेत सलग 8 व्या वर्षी 100% निकालाची गगनभरारी !

[ नायगाव बा. ता. प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
येथील लिटील टिप्स इंग्लिश स्कूलच्या SSC बोर्डाच्या परीक्षेत सलग 8 व्या वर्षी 100% निकालाची परंपरा कायम राखत लिटल स्टेप च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. यामध्ये संकेत शिवानंद डोईफोडे याने 95.60% घेऊन प्रथम क्रमांक मिळावीला तर वल्लभ गणेश अन्सापुरे 92.40% व नीरज गणेश अन्सापुरे 91.80% गुण प्राप्त करत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय शाळेतील सर्व विद्यार्थी विशेष प्रविण्या सह उत्तीर्ण झाले.
या सर्व गुणवंतांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार एज्युकेशन सोसायटी नायगाव च्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. आ. वसंतराव चव्हाण साहेब, संस्थेचे सचिव श्री रवींद्र पाटील चव्हाण साहेब, जि. प. चे माजी शिक्षण सभापती श्री संजय आप्पा बेळगे साहेब, जेष्ठ संचालक श्री केशवराव पाटील चव्हाण साहेब, श्री दत्ता पाटील इज्जतगावकर, श्री सूर्यकांत कोठाळे साहेब, श्री लक्ष्मण पा. जाधव मोकासदारेकर,संस्थेचे प्रा. कुणाल गारटे, प्रा. बालाजी शिंदे, प्रा. एन रविकुमार हे उपस्थित होते. 
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या