घुंगराळा येथे विद्यार्थी दिन साजरा..!

[ घुंगराळा प्रतिनिधी – दिपक गजभारे ]
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ०७ नोव्हेंबर १९०० रोजी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये ( आता प्रतापसिंह हायस्कूल ) पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. येथे ते इ.स. 1904 पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले..!
२०१७ साली महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण व्हावे म्हणून, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्यांच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी, म्हणून युवा कार्यकर्ते दीपक गजभारे घुंगराळेकर, यांच्या पुढाकाराने दिनांक ०७/११/२०२१ रोजी. प्रा.डॉ.माधव वाघमारे सर यांच्या निवासस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थी दिन साजरा करण्यात आला..!
याप्रसंगी, घुंगराळा नगरीचे सरपंच प्रतिनिधी श्री.मोहन जोगेवार श्री.पंडित पा सुगावे युवा कार्यकर्ते, प्रा.डॉ.माधव वाघमारे, श्री.वल्लीभाई शेख, श्री.बालाजी तुरटवाड, श्री.हौसाजी गजभारे श्री.माधव यमलवाड, श्री.भीमराव गजभारे, श्री.आच्युत गजभारे, श्री.आच्युत सोनसळे, श्री.दीपक गजभारे, श्री.सुनील सोनकांबळे, रोहित आढाव, आदी सर्व उपस्थित होतें…
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या