खेळातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो – जयपाल रेड्डी यांचे प्रतिपादन

 ( बिलोली ता.प्र – सुनिल जेठे )
शालेय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विविध खेळाची माहिती होऊन अशा खेळातून मैत्री भाव, खिलाडू वृत्ती आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्याबरोबरच शालेय जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्त्व असते. असे प्रतिपादन जयपाल रेड्डी यांनी केले. ते महात्मा फुले हायस्कूल, नाईक नगर च्या शाळेत २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शालेय क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. 
 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले हायस्कूल,नाईक नगर चे मुख्याध्यापक भारत कलवले हे होते. तर प्रमुख पाहुणे सी.बी.एफ.सी.चे मॅनेजर ऊत्तम कांबळे ,ज्येष्ठ शिक्षक एन.पी.केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.सुंदाळे यांनी केले. 
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही.एस. खवास पाटील यांनी केले तर आभार कु.संगीता वडजे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक, एच.आर.चव्हाण, ए.व्ही.रामगिरवार, एम. एन.गुंटूरकर, एस.पी.डांगे, अरविंद केंद्रे, डी.एम केंद्रे. नितीन रानशेवार, चंद्रमणी सोनकांबळे , शासकीय अध्यापक महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी सुचिता जाधव, ऐश्वर्या मुळेकर, इरम सबा रफिक, सुजाता कांबळे, सुचिता जोगदंड, भाग्यश्री जाधव आदींनी परिश्रम घेतले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या