विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि संस्कारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे – कुणाल लोहगावकर

इयत्ता दहावी ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आता यापुढे उच्च शिक्षणासाठी दारे खुले होणार आहेत .याकरिता यापुढे विद्यार्थ्यांनी शहरात उच्चशिक्षणासाठी गेल्यानंतर शिक्षण आणि संस्कारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे आव्हान तथा सल्ला येथील सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मिलिंद प्राथमिक आणि मिलिंद विद्यालयाचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ते येथील मिलिंद विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते .या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोहगावकर हे होते .तर प्रमुख अतिथी म्हणून मिलिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. एस. राठोड, मिलिंद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. एस .पांचाळ व मिलिंद प्राथमिक शाळेतील सहशिक्षक तथा पत्रकार सुभाषदरबस्तेवार उपस्थित होते.
पुढे बोलताना लोहगावकर म्हणाले की ,इयत्ता दहावीच्या मुलांची परीक्षा झाल्यानंतर आता पुढील उच्च शिक्षणासाठी त्यांची दारे खुली होणार आहेत. त्याकरिता विद्यार्थ्यांनी फक्त आणि फक्त अभ्यासक्रमावरच लक्ष ठेवले पाहिजे. मित्र-मैत्रिणींची सोबत सुद्धा चांगली निवडली पाहिजे.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत चांगली मेहनत करून चांगले गुण मिळून विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचे नाव उज्वल केले पाहिजे.विशेष म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आग्रहास्तव व ग्रामीण भागातील आपल्या शाळेत इयत्ता दहावी पर्यंत शिकणाऱ्या आणि पुढील उच्च शिक्षण शहरात जाऊन न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी लवकरच आपण ज्युनिअर कॉलेजची सुरुवात करू असेही आश्वासन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
याप्रसंगी यु. एस. राठोड सुभाष दरबस्तेवार सह शाळेतील इयत्ता नववी आणि दहावी च्या जवळपास पंचवीस विद्यार्थ्यांनी या निरोप समारंभाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमरदीप दगडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ. तेलगाने मॅडम यांनी मांडले. निरोप समारंभाच्या कार्यक्रमानंतर शाळेतील सर्व शिक्षकांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसह इतर वर्गातील सर्व मुला-मुलींना स्नेहभोजन दिले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या