तालुक्यातील कृष्णूर येथील जय भवानी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज कृष्णूर, शाळेत नूतन वर्ष निमित्ताने शांती निकेतन विद्यालय रुई बु. च्या शाळेचे मुख्याध्यापक गंगाधराव बन्नाकर यांनी आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ जय भवानी शाळेला आकर्षक चित्रफीत संच भेट दिली आहे.
या कार्यक्रमात बोलताना जय भवानी माध्यमिक व ज्यूनीअर कॉलेजचे विद्यमान मुख्याध्यापक मठपती म्हणाले की शाळेतील विध्यार्थानी ज्ञाना बरोबर ज्ञान संपादन करून त्यांची गुणवत्ता वाढीस लावली पाहिजे असे प्रतिपादन केले आहे.
तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बुद्रुकचे मुख्याध्यापक बनाळीकर यांच्या आई वडिलांच्या प्रित्यार्थ जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक विद्यमान मठपती यांच्या सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला आहे.
सन २०२३नूतन वर्षांच्या निमित्ताने जय भवानी शाळेला चित्रफित असी अनोखी भेट दिली. त्यांच्या भेटीबद्दल जय भवानी ज्यू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने बनाळीकर यांचा शाल व श्रीफळ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला असून शिक्षक क्षेत्रात शांती निकेत विद्यालय रुई बु व जय भवानी माध्यमिक ज्यू. कॉलेज कृष्णूर गुणवते बाबतीत अग्रेसर असल्याचे मुख्याध्यापक मठपती यांनी आवर्जून सांगितले आहे.
त्यात क्रांतिवीर, भारतरत्न, शास्त्रज्ञ,परमवीर चक्र विजेते, ऑलिंपिक विजेते, वाइल्ड क्लब, अस्ट्रॉनॉमिक क्लब, यांच्या सुंदर प्रतिमा आणि त्यांच्या जीवनचरित्रावर माहिती असलेली किट शाळेला भेट दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य श्री परबतराव पा. जाधव, केंद्रप्रमुख श्री उद्धव ढगे, शिवाजीराव पा.जाधव, बळवंतराव पा. जाधव पत्रकार, शिवराज पा. जाधव आदी वेळी उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाला बाबू मिया शेख, सेवानिवृत्त शिक्षक गोविंदराव गुरुजी, मानेजी पाटील, उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री एन. एन. मठपती यांना चित्रफीत संच प्रदान करण्यात आला. उद्धव ढगे सर आणि शिवराज पा.जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी नांदेड जिल्ह्याची तोफ कै. केशवभाई धोंडगे यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy