विद्यार्थ्यांत जिद्ध,चिकाटी,संयम असणे गरजेचे आहे – मा.महादेवराव पाटील – मा.सभापती पंचायत समिती !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
म्हसळा भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवी जिजामाता मराठी माध्यमीक शाळा आगरवाडा येथे सोमजाईमाता क्रीडा मंडळ खरसई यांच्या मार्फत सालाबादप्रमाणे विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या प्रगतीमध्ये समाजातील सर्व घटकाचे व सेवाभावी संस्थेचे योगदान मोठ्या प्रमाणे लाभत आहे. तरी विद्यार्थ्यांनी जिद्ध,संयम, आणि चिकाटी राखणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिजामाता शिक्षण संस्था म्हसळा संस्थापक मा. महादेवराव पाटील साहेब यांनी विध्यार्थ्यांना वह्या वितरण समारंभ कार्यक्रमात केले.

   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. महादेवराव पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे सोमजाईमाता क्रीडा मंडळ खरसई चे संस्थापक श्री चंद्रकांत खोत, हे होते. या प्रसंगी सोमजाईमाता क्रीडा मंडळाचे पदाधिकारी श्री पांडुरंग माळी, श्री नरेश कातळकर, महादेव कांबळे, पांडुरंग पाटील जिजामाता शिक्षण संस्थेचे संचालक मा श्री मनोज नाकती मा. सरपंच तोंडसुरे, देवेंद्र डाऊल मा सरपंच, जेष्ठ कार्यकर्ते श्री रामचंद्र भुवड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोमजाईमाता क्रीडा मंडळ खरसई चे संस्थापक श्री चंद्रकांत खोत यांनी विद्यार्थ्याना शालेय साहित्यासाठी लागणारी सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
श्री नरेश कातळकर असे म्हणाले कीं, समाजातील गोरगरीब विध्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना अनेक अडचणी येतात त्या कुठेतर दूर व्हावे म्हणून सोमजाईमाता क्रीडा मंडळ मदत करण्यासाठी पुढाकार घेत असते व अनेक कार्यक्रमाचे आयोजन करत असते तरी इतरांनी ही पुढाकार घेतला पाहिजे कीं जेणे करून समाजाचे आपण देणे लागते हे विसरून चालणार नाही शाळेचे मुख्याध्यापक श्री संदिप कांबळेकर यांनी प्रास्ताविका मध्ये शालेय गुणवत्ता विद्यार्थ्यांची प्रगतीसाठी पालकांनी, सर्वानी पुढाकार घ्यावा असे म्हणाले.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व सरस्वतीमातेच्या पूज्यनाणी करण्यात आले. शाळेचे शिक्षक श्री नितीन म्हस्के व दिपक म्हात्रे यांनी मनोगत व्यक्त केले पालक वर्ग ही मोठ्या संख्येने या कार्यक्रमास व पालक मीटिंगेस उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदिप सुतार यांनी केले तर आभार श्री अंगद कांबळे यांनी व्यक्त केले.

मास महाराष्ट्र न्युज- थोड्याच कालावधीत लोकप्रिय…

रायगड जिल्ह्यात तालुका प्रतिनिधी नेमणे आहे..

संपर्क – 9834102351

Www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या