आगामी निवडणूका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – सुभाष गायकवाड !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
२०२४ हे निवडणुकांचे वर्ष आहे हे लक्षात घेऊन पक्षाची ताकद वाढवून कार्यकर्त्यांनी झपाटून कामाला लागावेअसे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार ) तालुकाध्यक्ष पदी सुभाष गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस प्रा.डी.बी.जांभरूणकर यांची उपस्थिती होती. बिलोली तालुक्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री.गायकवाड म्हणाले की, येत्या वर्षभरात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकाच्या निवडणूका होणार असल्याने कार्यकर्त्यांनी गावोगावी पक्षाच्या शाखा स्थापन करून आपली ताकद वाढवावी व निवडणुकांना सामोरे जावे.
यावेळी प्रा.शंकर पवार, बिलोलीचे माजी उपनगराध्यक्ष सलीम शेख,शेख महेबुब व अ.असद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. याप्रसंगी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.मजहरोद्दीन, जिल्हा सरचिटणीस संग्राम हायगले,प्रा.शंकर पवार यांची पक्षवाढीच्याबाबतीत सविस्तर मार्गदर्शन झाले.प्रा.डी.बी जांभरूणकर यांनी अध्यक्षीय भाषणात, सुभाष गायकवाड यांच्या नियुक्तीमुळे एक राजकीय अनुभवसंपन्न व्यक्तीमत्व राष्ट्रवादी काँग्रेसला अध्यक्ष लाभल्याने पक्ष सक्षम व सक्रीय होईल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास दत्तगीर महाराज लोहगाव कर,सादिक पटेल, शेख मोहसीन, शेख रशिद, चक्रधर पाटील, हनमंत कदम,प्रदिप गाजेवार,गनी कुरेशी, गिरीधर बडूरकर,धम्मपाल जाधव आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंडलवाडीचे शहराध्यक्ष अमरनाथ कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बिलोलीचे शहराध्यक्ष आनंद गुडमलवार यांनी मानले.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या