कृषी विभागाकडून सबसिडीवर देण्यात येणारे सोयाबीनचे बियाणे खरेदीवरचे जाचक अटी रद्द करा – संभाजी भिलवंडे 

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सबसिडीवर देण्यात येणारे सोयाबीन बियाणे महामंडळाचे ७२६ याच्या खरेदीवर जाचक अटी लादण्यात आल्या त्यारद्द् करून फक्त सातबारावर शेतकऱ्यांना सबसिडीवरचे सोयाबीन बियाणाची खरेदी करण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी नांदेड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी विभागीय कृषी संचालक यांच्याकडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यात मृग नक्षत्र पुर्णपणे कोरडे जावून आर्दडा नक्षत्र सुरू झाले तरीही अध्याप पेरणीयोग्य पाउस झाला नसल्यामुळे पेरण्या लोंबकळत पडल्या आहेत त्यामुळे परीसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे असून अध्याप बि-बियांनाची व खतांची खरेदी होत नसताना दिसून येत आहे, आगोदरच वर्षभर शेतात राबून मेहनत करून जो शेतमाल होतो त्याच्या उत्पन्नात घट होऊन ते निम्म्यावर आले आहे त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, याउलट बि-बियाणे व खताचे भाव दुपटीहून अधिक प्रमाणात वाढले आहेत यामुळे शेतकरी अर्थिक संकटात सापडला आहे यामुळेच बि- बियाने केंद्रावर अजीबात खरेदी करताना शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत नाही.
महामंडळाकडून कडून शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे के.डी.एस. ७२६ ह्या वानाची प्रतेकी सात बारावर एक बॅग सबसिडीवर देण्यात येत असुन त्यासाठी प्रथम ऑनलाईन नोंदणी करून ते पावती तालुक्यातील कृषी विभागाला सातबारासह देवून, त्याचे परमीट घेवून ते परमीट कृषी विभागाकडून नेमणूक करण्यात आलेल्या बियाणे केंद्रावर जाऊन खरेदी करावे अशा प्रकारच्या वेळकाढू व जाचक आटी लादण्यात आल्या आहेत त्या सर्व अटी रद्द करून जसे महामंडळाकडून फक्त सातबारावर देण्यात येणारे सोयाबीन १५८ हे बियाणे ऊपलब्ध आहे त्याच धर्तीवर सोयाबीन के.डी.एस.७२६ हे बियाणे देखील थेट सातबारावर हेक्टरी चार बॅग खरेदी करता येण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांनी विभागीय संचालक कृषी विभाग लातूर श्रीयूत जगताप साहेब यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागणी केली असुन येत्या सोमवारपासून सदर बियाणाची खरेदीवरच्या जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना थेट सातबारावर खरेदी करता येईल असे आश्वासन कृषी विभागाकडून देण्यात आले.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या