जिद्दीच्या बळावर यशाला गवसणी घालता येते – संतोष शेकडे

[ कुंडलवाडी प्रतिनिधी – अमरनाथ कांबळे ]
विपरित परिस्थितीची तमा न बाळगता अंगी जिद्द बाळगून अविरतपणे प्रयत्नरत राहिल्यास यशाला गवसणी घालता येऊ शकते असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे यांनी केले. येथील कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनींना निरोप समारंभ देण्यात आला.
कार्यक्रम अध्यक्षस्थानी संस्था सचिव डॉ. प्रशांत सब्बनवार तर प्रमुख पाहुणे म्हणून कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे व पोलीस उपनिरीक्षक नारायणराव शिंदे , मिलिंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती माया खंदारे , नागनाथ चेटलुरे यांची उपस्थिती होती. विपरीत परिस्थितीचा बागुलबुवा न करता व मनात कसलाच न्युनगंड न बाळगता जिद्द ठेवून कार्यप्रवण राहिल्यास तुम्हाला यशापासून कोणीही रोखू शकत नाही असे प्रतिपादन संतोष शेकडे यांनी केले.
यावेळी एन एम एम एस व वक्तृत्वस्पर्धेत यशस्वी विद्यार्थीनी आरती मोकळे, पुजा जल्दावार, शिवगंगा खांडरे, अक्षता तानुरेव इंटरमिडीएट परिक्षेतील श्रीजा कप्पूरवार यांच्यासह आय ए एस श्रेया इंटेलिजन्स परिक्षेतील यशस्वी रूपाली गट्टूवार, फुर्रखान शेख, मनोज जंगलवार, रोहित सुरकुटलावार, नवनिता शिरेवार, श्रावणी कोलंबरे, वरुण गुरुपवारव राधिका कोलंबरे यांचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नारायणराव शिंदे ,डॉ. प्रशांत सब्बनवार मुख्याध्यापक कल्याण गायकवाड ,सारिका सब्बनवार ,श्रीमती माया खंदारेआदींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुञसंचालन रविकांत शिंदे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आकाश अर्जुने यांनी मानले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या