सृष्टी व युवान चौधरी बंधू भगिनींचे स्पर्धा परीक्षेत यश !

[ कुंडलवाडी – अमरनाथ कांबळे ]
येथील के.रामलू पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता नववी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. सृष्टी विजय चौधरी हिने नुकतेच डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक या स्पर्धा परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थीनी म्हणून यश प्राप्त केलेली आहे.

तर तिचाच लहान भाऊ व के.रामलू पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता दुसरी वर्गात शिकत असलेला युवान विजय चौधरी याने नॅशनल सायन्स ऑलम्पीड परीक्षेत सुवर्णपदक मिळवत दोघे बंधू भगिनीने घवघवीत यश संपादन केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 2022- 23 या शैक्षणिक वर्षात ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन सायन्स टॅलेंट सर्च कॉम्पिटिशन च्या वतीने डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा व नॅशनल सायन्स ऑलम्पीड परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
या परीक्षेत येथील के. रामलू पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता नववी वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कु. सृष्टी विजय चौधरी व तिचा भाऊ युवान विजय चौधरी या दोघांनी विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ताधारक ठरले आहेत. ते येथील सृष्टी काॅम्पूटर चे संचालक विजय चौधरी व गटसाधन केंद्र बिलोली येथील डाटा ऑपरेटर सौ.अर्चना अन्सापूरे मॅडम यांची मूलगी व मूलगा आहेत.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सायरेडी ठकूरवार, संचालिका सौ. रमा ठकूरवार, शाळेचे मुख्याध्यापक पापय्या मठवाले, पर्यवेक्षक राजेश कागळे,विज्ञान शिक्षिका सौ.संध्या पाठक, कृपेश पडकुटलावार, सौ.दाक्षायणी नुग्रावार, सृष्टी व युवान चे आजी आजोबा, काका मावशी व शाळेतील सवॅ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या