के. रामलू शाळेचे इंटरनॅशनल इंग्लिश ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत यश !

[ कुंडलवाडी प्रतिनिधी- अमरनाथ कांबळे ]
         येथील के रामलू पब्लिक स्कुल या शाळेच्या 11 विध्यार्थी हे इंटरनॅशनल इंग्लिश ओलंपियाड या स्पर्धा परीक्षेत बसले होते सदरील परीक्षा हि दिनांक 02 ऑक्टोबर रोजी पार पडली.या परीक्षेत श्रेया मारोती इबतेवार,स्वराज सुनील शिंदे, सुफियान वाजिद शेख, समीक्षा शंकरराव कोरूळे, अभिषेक नरेश तेलकेश्वर, आरुषी नितीन भोसले यांनी 40 पैकी 31 गुण घेऊन शाळा स्तरावर पहिला क्रमांक मिळविला तर साईजोता माधव खरबाळे, श्रीजल मारोती ओनरवाड, सानिध्या साईनाथ बोलचेटवार 29 गुण घेऊन शाळा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केले असून ओमकार बालराज बाबळीकर, आदित्य सदानंद नायगावे 28 गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावत गोल्ड मेडल मिळविले आहे.
         या यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे के. रामलू शाळेचे संस्थापक अध्यक्ष सायरेड्डी ठक्कूरवार संचालिका रमा ठक्कूरवार, प्रिन्सिपल टी. नरसिंगराव यांनी अभिनंदन केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या