शुभदा दरबस्तेवारला आयएमओ परीक्षेत सुवर्णपदक !

 [ कुंडलवाडी वार्ताहर – अमरनाथ कांबळे ]
येथील के.रामलू पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी कुमारी शुभदा सुभाष दरबस्तेवार हिने 2023- 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स ऑलंपियाड आय. एम. ओ. या गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षेत शाळेतून प्रथम रॅन्क मिळवून सुवर्णपदक पटकावली आहे. ती आता दुसऱ्या परीक्षेसाठी पात्र ठरलेली आहे.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सायरेड्डी ठकुरवार, सचिव यशवंत संगमवार, संचालिका सौ. रमा ठकूरवार, प्राचार्य टी.नरसिंगराव, मुख्याध्यापक पापय्या मठवाले, पर्यवेक्षक राजेश कागळे, गणित विषयाचे शिक्षक दत्तराम लाड यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या