महाराष्ट्र विकास आघाडी च्या मागणीला यश ; नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार न.पा. लोहाच्या वतीने सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात !

[ विशेष प्रतिनिधि / रियाज पठान ]
महाराष्ट्र विकास आघाडीने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन लोहयात नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार न.पा. च्या वतीने सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात झाली. रक्षणासाठी व गुन्हेगारीवर आळा बसविने दखल घेत असल्यामुळे जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लोहा शहरात मागील एक ते दोन महिन्यांपासून चोऱ्या ,दरोडे, लुटमार,खुनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. लोहा शहरांच्या इतिहासात प्रथमच दोन खुनाच्या घटना घडल्यात यामुळे लोहा शहरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. भितीयुक्त वातावरणात नागरिक वावरत आहेत. रात्रीच्या वेळी घराबाहेर येण्यास नागरिक भीत आहेत.मागील तीन चार आठवड्यात लोहा शहरात खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. यात बसस्थानकासमोर जुना लोहा येथील युवक ‌रवि कहाळेकर यांच्या पोटात चोरट्यांनी चाकु मारुन जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केले त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.तसेच नुकतेच शनिदेव मंदिर आवारात छबूबाई ठाकूर या महिलेचा अज्ञात व्यक्तीने गळा कापुन खुन केला.‌तसेच काही दिवसांपूर्वी लोहयाचे माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक केशवराव मुकदम यांच्या घरी दरोडा पडला, तलाठी काॅलनी, शिक्षक काॅलनी येथे चोऱ्या झाल्या तसेच मुख्य रस्त्यावर कापुस विकुन गाडीत बसून घराकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीचे आॅईल गळाले म्हणून गाडीतील ३.८५ लाख रुपये चोरट्यांनी पळविले तसेच ,आठवडी बाजारात अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत . रात्रीच्या वेळी घराबाहेर येण्यास नागरिक घाबरत आहेत.तेव्हा लोहा शहरात प्रशासनाने चोरीच्या घटनेला पावबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत त्यामुळे चोर पकडण्यात पोलीस प्रशासनाला मदत होईल. अशी मागणी जनतेतून , राजकीय पक्ष, सामाजिक संघटने कडून होत होती.तेव्हा जनतेच्या मागणीनुसार लोहा शहरातील जनतेच्या रक्षणासाठी गुन्हेगारावर आळा बसविण्यासाठी व पोलिस प्रशासनाला मदत करण्यासाठी लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे हे सरसावले असून नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी न.पा. प्रशासनाला आदेशीत करून लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात ४सीसीटीव्ही कॅमेरे, भाजी मंडई चौकात २ व्यंकटेश गार्डन जवळ १, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या कमानी जवळ १, दुसऱ्या कमानी जवळ १, सरकारी दवाखाना १, शनिदेव मंदिर १, बसस्थानक परिसर २, आदी १५ ठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत..तसेच लोहा शहरात सर्वे करून पोलीस निरीक्षक तांबे सोबत तात्काळ बैठक घेऊन आवश्यक त्या ठिकाणी प्रत्येक वार्डात ,वाडी तांड्यावर 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत अशी माहिती नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांनी दिली.
यावेळी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष छत्रपतीदादा धुतमल, जेष्ठ नगरसेवक बबन निर्मले, बालाजी खिलारे,गटनेते करीम शेठ, संभाजी चव्हाण, जिवन चव्हाण, संदिप दमकोङावार, नबि शेठ, भास्कर पवार, केतन खीलारे, मारोती शळके, युवराज वाघमारे, भानुदास पाटील, संजय चव्हाण, माधव हामदे, गोविंद वड असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र विकास आघाडीने दिलेल्या निवेदनाची दखल घेतल्या बदल महाराष्ट्र विकास आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष शुभम उत्तरवार, म.वि.आ.जिल्हाअध्यक्ष मारोती राठोड, म.वि.आ. तालुका अध्यक्ष गोविंद पवार, कैलास सूरनर पत्रकार संतोष चेउलवार,पत्रकार किरण दाढेल,दैनिक चालु वार्ता चे पत्रकार माधव गोटमवाड,पत्रकार सय्यद अकबर यांनी नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी, सी. ओ गंगाधर पेंटे साहेब यांचे जाहीर आभार मानले.
www.massmaharashtra.com

ताज्या बातम्या