मा.आयु.प्रदिप सुधाकर मोहिते यांची साने गुरुजी बालभवन वाचनालय ला भेट !

[ रायगड/म्हसळा प्रतिनिधी – प्रा.अंगद कांबळे ]
म्हसळा – १५ आक्टोबर २०२१ रोजी साने गुरुजी बालभवन वाचनालय भापट या वाचनालयाला समाजसेवक श्री प्रदिप सुधाकर मोहिते भारतीय बौद्ध महासभा संस्कार सचिव रायगड जिल्हा दक्षिण विभाग, चंद्रकांत मोहिते यांच्या तर्फे १५ पुस्तके ऐतिहासिक, महापुरुषांचे चरित्र, कांदबरी, कविता संग्रह, वाड्मय, भगवद्गीता आदी पुस्तके भेट दिली.

आयु. प्रदिप मोहिते मु. कपिलवस्तूनगर ता. श्रीवर्धन भरीव नेतृत्व,समाजसेवेची व शैक्षणिक क्षेत्राची आवड असणारे यांनी म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागात भापट या गावी वाचनालय ला भेट दिली असता या पंचक्रोशीतील विद्यार्थी या वाचनालय चा पूर्णपणे लाभ घेत आहेत अशाच पद्धतीने वाचक तयार झाले पाहिजेत आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करून तुमच्यातील उद्या अधिकारी वर्ग तयार झाला पाहिजे अशा शुभेच्छा मोहिते साहेब यांनी विद्यार्थ्यांना दिल्या वाचनालयाची उभारणी केल्याबद्दल बेटकर सर यांचे आणि टिमचे कौतुक केले.
यावेळी आयु प्रदिप मोहिते, लक्ष्मण मोहिते, रविंद्र कुवारे, जयसिंग बेटकर, देवडे सर, गौरव मोहिते, रूतिका बेटकर, स्वप्नाली मोहिते, निकिता जोशी आदी उपस्थित होते.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या