तिरुपतीत महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अधिवेशन व भक्त निवासाचे थाटात भूमिपूजन.
[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
सात्विकता, प्रामाणिकता, लिनता, सभ्यता, दानशूरता असा असलेला आर्य वैश्य समाज आणि या समाजात मला पुन्हा पुन्हा जन्म मिळावा अशी मी देवाजवळ सदैव प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रातील तळागाळात असलेल्या आर्य वैश्य समाजातील सर्व समाज बांधवांच्या उन्नतीसाठी आपला सदैव प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंध्र प्रदेशातील तिरुपती या ठिकाणी केले. महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या वतीने भरविण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारी मंडळाच्या दुसऱ्या अधिवेशनात आणि महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा भक्तनिवास भूमिपूजन सोहळ्यानिमित्त तिरुपतीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यसभेचे माजी खासदार टी.जी. व्यंकटेश, हिंगणघाट येथील आमदार समीर कुणावार, आंध्र प्रदेश पर्यावरण व्यवस्थापन महामंडळाचे अध्यक्ष गुबा चंद्रशेखर, तिरुपती येथील आमदार भुमन्ना करूणाकर, काशी अन्नसत्रचे समिती सदस्य विलास बच्चू, तिरुपती येथील महापौर श्रीशा यादव, येलुरी लक्षमय्या, देवकी व्यंकटेश ,दिलीप कंदकुर्त, भावनाशी श्रीनिवासा, एकनाथ मामडे, पशुपती गोपीनाथ, डी. नरसीमल्लू, अखिल भारतीय महिला महासभेच्या अध्यक्षा माधुरी कोल्हे, राज्याच्या महिला अध्यक्ष सुलभाताई वट्टमवार, डॉ. डी. आर. मुखेडकर, एडवोकेट केसरला चंद्रशेखर, पी. विकास, जी. के रोनी, सुभा राजू, एन. शिवकुमार यांच्यासह आंध्र प्रदेश तिरुपती येथील व महाराष्ट्रातील विविध मान्यवरांच्या साक्षीने भूमिपूजन सोहळा व अधिवेशन पार पडले.
महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, कोषाध्यक्ष सुभाषराव कन्नावार, बांधकाम समितीचे अध्यक्ष भानुदास वट्टमवार, राज्यसंघटन प्रमुख प्रदीप कोकडवार, राज्य प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र येरावार, बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष अनिल मनाठकर, महासभेचे उपाध्यक्ष राजू मुक्कावार, सुधीर पाटील, नंदकुमार मडगुलवार, यांच्यासह महासभेचे राज्य कार्यकारिणी, जिल्हाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नाला मोठे यश आले.
महासभेने जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमानुसार येत्या वर्षभरामध्ये विविध उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. त्यात तिरुपती येथे भक्त निवास उभारणे,पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणे, ओबीसी प्रवर्गामध्ये समाजाचा समावेश करणे, महाराष्ट्रात मोजकेच वधू-वर परिचय मेळावे भरविणे, आर्य वैश्य समाजातील गरजवंतांना घरकुल मिळवून देणे असा पंचसूत्री कार्यक्रम महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी जाहीर केला आहे. या पंचसूत्रीला बेटी बचाव, बेटी पढाव हा जोड दिला जाणार आहे.
याप्रसंगी सौ. सपनाताई मुनगंटीवार यांनी महिलांना मार्गदर्शन केले. अधिवेशनाचे प्रास्ताविक महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई यांनी केले.
We use cookies to ensure that we give you the best experience on our website. If you continue to use this site we will assume that you are happy with it.AcceptPrivacy policy