सुगाव दुहेरी आत्महत्या प्रकरणी अटकेतील मुख्य आरोपींस उच्च न्यायालायकडून सशर्त जामीन मंजुर.

देगलूर तालुक्यातील सुगाव येथे १४ नोव्हेंबर रोजी सासरच्या मंडळींनी मुलीला जाच देऊन पाच लाख रुपये हुंड्याची मागणी केली. सासरकडील मंडळीच्या जाचाला कंटाळून मुलीच्या पित्याने आत्महत्या केली होती तर वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने मुलीचेही निधन झाले होते.
या कारणाने देगलुर पोलीस स्टेशन येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या व हुंड्यासाठी छळ केला म्हणून भा.द.वि.306,498-A व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्यातील आरोपींना पोलीसांनी दि.16 जानेवारी रोजी अटक करून कोर्टात हजर केले होते. त्या नंतर संबंधित आरोपींच्या नातेवाईकांनी बिलोली येथील सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.त्यात चार आरोपींची जामीन मंजुर करत एकाचा जामीन फेटाळला होता. त्या नाराजीने सदरील आरोपीच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालय,औरंगाबाद येथे ॲड. अविनाश सूर्यवंशी कावळगावकर यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता. मा. न्यायमूर्ती. वि.वि.कनकनवडी यांच्या समोर सुनावणीस आले असतां मा.न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन आरोपीस सशर्त जामीन मंजुर केला. आरोपींच्या बाजूने ॲड. अविनाश सूर्यवंशी कावळगावकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या