परमेश्वर पा.डोईफोडे यांची महाराष्ट्र ऊस उत्पादक संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

[ नायगाव बा.तालुका प्रतिनिधी – गजानन चौधरी ]
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी गेल्या वर्षांपासून लढणाऱ्या आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळविण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणारे उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी सुपुत्र परमेश्वर व्यंकटराव पाटील इज्जतगांवकर यांची महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून या नियुक्ती बद्दल नायगाव तालुक्यासह जिल्ह्या स्तरातून अभिनंदन होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात ऊस पिकात नवनवीन प्रयोग यशस्वी करून अधिकचे उत्पन्न काढणाऱ्या निवडक प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष अतुलनाना माने पाटिल यांच्या वतीने केला जातो त्याअनुषंगाने इज्जतगांव बु. ता.नायगांव येथिल प्रगतशिल युवा शेतकरी परमेश्वर व्यंकटराव पाटिल डोईफोडे हे अनेक वर्षापासुन ते सतत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस शेतीबद्दल मार्गदर्शन करत असतात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे ते काम करत आहेत.म्हणून त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी संघाचे अध्यक्ष अतुलनाना माने पाटिल यांनी दखल घेऊन परमेश्वर व्यंकटराव डोईफोडे यांची नांदेड जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करून नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
या निवडीमुळे या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून परमेश्वर डोईफोडे यांचे अभिनंदन होत आहे.
Www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या