वाघलवाडा साखर कारखान्याचा 2022-23 द्वितीय गाळप हंगामाला सुरुवात.

[ नांदेड जिल्हा प्रतिनिधी- आनंद सुर्यवंशी ]
एम.व्ही.के.ॲग्रो फूड प्रोडक्ट कुसुमनगर वाघलवाडा (साखर कारखाना) गव्हाण पूजन करून 2022-23 चा गळीत हंगाम सुरू.
एम.व्ही.के.ॲग्रो फूड वाघलवाडा च्या 2022-23 गळीत हंगामाला सुरुवात झाली. कारखान्याचे चेअरमन तथा शेतकरी नेते मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली गव्हाण पूजन झाले आणि उसाची मोळी टाकून गळीत हंगामाला सुरुवात झाली.
प्रथम ऊस वाहतूक ठेकेदाराचा सन्मान ही करण्यात आला. आपल्या परिसरातील शेतकरयांना न्याय देण्याच्या भूमिकेतून कार्य करत राहणार असा विश्वास व्यक्त केला. तसेच दत्तहरी पाटील,आणि श्रीराम पाटील जगदंबे यांनी कवळे गुरुजी यांच्या उद्योग समूहाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्ही.पी.के.उद्योग समूहाचे सी ई ओ संदीप पाटील कवळे,संचालिका कू.पुजा पाटील कवळे,प्रभाकर पाटील पुयेड(सरपंच सिंधी) शंकर पाटील कदम लघळुदकर,गणपत पाटील हासेकर, लक्ष्मण पाटील शिंदे,हरेगावकर तानाजी पाटील शिंदे हरेगावकर, वेंकट पाटील गुजरिकर,यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव, व्यवस्थापक व सर्व विभाग प्रमुख आणि सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
www.massmaharashtra.com 

ताज्या बातम्या